Halad Market Update : वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. विशेषतः १० व ११ एप्रिल रोजी हळदीची विक्रमी आवक (arrival) नोंदवण्यात आली.(Halad Market)
गुरुवार, १० एप्रिल रोजी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत १० हजार ८५० क्विंटल, तर शुक्रवार, ११ एप्रिल रोजी वाशिम बाजार समितीत तब्बल १३ हजार ७०० क्विंटल हळदीची आवक झाली. अर्थात केवळ दोनच दिवसांत २४ हजार ५५० क्विंटल हळदीची आवक (arrival) झाली आहे.(Halad Market)
वाशिम आणि रिसोड या दोनच बाजार समित्यांमध्ये हळदीची अधिकृत खरेदी होत असल्याने जिल्हाभरातील शेतकरी आपली हळद विक्रीसाठी याच बाजारात आणतात. मात्र, हळदीसाठी आठवड्यातील केवळ एकच दिवस व्यवहारासाठी ठेवण्यात आलेला असल्याने त्या दिवशी हळदीची प्रचंड प्रमाणात आवक (arrival) होत आहे.(Halad Market)
सध्या हळदीचा काढणी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. शेतकरी काढलेली हळद सुकवून व प्रक्रिया करून बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. परिणामी, प्रत्येक आठवड्यात हळदीची आवक (arrival) वाढत आहे.(Halad Market)
मागील आठवड्यात रिसोड बाजार समितीत ५ हजार ६२३ क्विंटल हळदीची आवक झाली होती. मात्र, याच बाजारात गुरुवारी १० हजार ८५० क्विंटलची विक्रमी नोंद झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वाशिम बाजार समितीत १३ हजार ७०० क्विंटल हळदीची आवक (arrival) झाली.(Halad Market)
आवक वाढल्याने मोजणीला विलंब
रिसोड बाजार समितीत हळदीची विक्रमी आवक झाल्यामुळे इतर शेतमालासह हळदीची मोजणी करण्यास विलंब झाला. परिणामी, काही प्रमाणात राहिलेल्या हळदीची मोजणी थांबवली गेली.
हळदीला कोठे किती दर
वाशिम बाजार समिती
हळद प्रकार | किमान दर | कमाल दर |
कान्डी | १२,४५० | १४,७०० |
गहू | १२,०५० | १३,५०० |
रिसोड बाजार समिती
हळद प्रकार | किमान दर | कमाल दर |
कान्डी | ११,७०० | १३,७७५ |
गहू | १०,८०० | १३,१०० |
हे ही वाचा सविस्तर : Harbhara Market : हरभऱ्याची आवकेत तिप्पटीने वाढ; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर