Lokmat Agro >बाजारहाट > Gram, Turi Market: हरभरा, तुरीतून आशा की निराशा जाणून घ्या सविस्तर

Gram, Turi Market: हरभरा, तुरीतून आशा की निराशा जाणून घ्या सविस्तर

Gram, Turi Market: Know in detail whether there is hope or disappointment from gram, turi | Gram, Turi Market: हरभरा, तुरीतून आशा की निराशा जाणून घ्या सविस्तर

Gram, Turi Market: हरभरा, तुरीतून आशा की निराशा जाणून घ्या सविस्तर

Market Yard : हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात हरभरा आणि तुरीची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे आता या शेतमालातून शेतकऱ्यांना निराशा तर होणार नाही ना या कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Market Yard : हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात हरभरा आणि तुरीची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे आता या शेतमालातून शेतकऱ्यांना निराशा तर होणार नाही ना या कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात हरभऱ्याच्या (Chickpea) दरात क्विंटलमागे जवळपास २०० ते २५० रुपयांची घसरण झाली आहे. तर, सोयाबीन (Soybean), तुरीचीही (Tur) दरकोंडी कायम असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा आहे. अलीकडच्या काळात दरवर्षी पावसाचा लहरीपणा शेतीसाठी नुकसानदायक ठरत आहे.

त्यातच पिके ऐन भरात असताना किडीचा प्रादुर्भावही वाढत असल्यामुळे उत्पादनात प्रचंड घट होत आहे. यंदा सोयाबीन ऐन भरात असताना येलो मोझॅकचा हल्ला झाला. यात अनेक शेतकऱ्यांचे उभे सोयाबीन करपले.

परिणामी, उत्पादनात घट झाली. त्यातच बाजारात भावही कवडीमोल मिळत असल्याने लागवड खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार तूर, हरभरा पिकावर होती.

मात्र, डिसेंबरमध्ये ढगाळ वातावरणाचा फटका दोन्ही पिकांना बसला आणि उत्पादनात घट झाली. त्यातच बाजारात भावही समाधानकारक मिळत नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

हिंगोलीच्या मोंढ्यात हरभऱ्याला  फेब्रुवारीच्या प्रारंभी ५ हजार ७०० रुपये भाव मिळाला. सध्या मात्र क्विंटलमागे ११ हजार भाव तुरीला होता मिळाला गतवर्षी  फेब्रुवारीच्या प्रारंभी सरासरी ५ हजार ७०० रुपये भाव मिळला.

सध्या मात्र क्विंटलमागे २०० ते २५० रुपयांची घसरण झाली आहे. तर, गतवर्षी तुरीला ११ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. आता मात्र सरासरी ७ हजार २०० रुपयांवर भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, शेतकऱ्यांतून भाववाढीची प्रतीक्षा केली जात आहे.

तुरीची आवक मंदावली

* शेतकऱ्यांकडे तूर उपलब्ध होऊन जवळपास एक महिन्याचा कालावधी उलटला. बहुतांश शेतकऱ्यांनी तूर विक्री केली आहे.

* ज्या शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा होती, त्यांनी तूर विक्रीविना ठेवली होती. परंतु, महिना उलटूनही दरकोंडी कायम असल्याने आता उर्वरित शेतकरी तूर विक्रीसाठी आणत आहेत.

* सध्या सरासरी ३०० ते ४०० क्विंटलची आवक होत आहे आहे. तर, सरासरी ७ हजार २०० रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे.

हरभऱ्याची विक्रमी आवक

मागील दोन-तीन वर्षांत शेतकऱ्यांचा कल हरभऱ्याकडे वाढला आहे. सध्या मोंढ्यात विक्रमी आवक होत आहे. गुरुवारी तब्बल एक हजार १५० क्विंटलची आवक झाली होती. किमान ५ हजार ते कमाल ५ हजार ४३५ रुपये भाव मिळाला. तर, सरासरी ५ हजार २१७ रुपये भाव राहिला.

दरकोंडीमुळे शेतकरी मेटाकुटीला...

शेतकऱ्यांकडे शेतमाल उपलब्ध होताच बाजारात भाव गडगडतात. हा अनुभव नेहमीचाच झाला असल्याने शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे. सोयाबीन, कापूस, तूर, हरभरासह इतर पिकांची दरकोंडी कायम राहत असल्याने लागवड खर्चही वसूल होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या दरकोंडीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

हे ही वाचा सविस्तर :  Market Yard : रिसोड बाजार समितीत 'हळद परिषद'चे आयोजन

Web Title: Gram, Turi Market: Know in detail whether there is hope or disappointment from gram, turi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.