Lokmat Agro >बाजारहाट > शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. कापूस निर्यातीला अनुकूल स्थिती, आपल्या कापसाला जगभर मागणी

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. कापूस निर्यातीला अनुकूल स्थिती, आपल्या कापसाला जगभर मागणी

Good news for farmers.. Good condition for cotton export, worldwide demand for our cotton | शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. कापूस निर्यातीला अनुकूल स्थिती, आपल्या कापसाला जगभर मागणी

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. कापूस निर्यातीला अनुकूल स्थिती, आपल्या कापसाला जगभर मागणी

फ्रेबुवारीत कापसाची निर्यात गेल्या दोन वर्षांतील उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. देशातील व्यापाऱ्यांनी आशियातील प्रमुख खरेदीदारांसोबत कापसाच्या तब्बल ४ लाख गाठींच्या खरेदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. कापसाचे देशांतर्गत उत्पादन घटले असले तरी निर्यातीला अनुकूल स्थिती असल्याने उत्पादकांना लाभ होणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

व्यापाऱ्यांनी फेब्रुवारीमध्ये चीन, बांगलादेश, व्हिएतनाम आदी देशांसोबत ४ लाख कापसाच्या गाठी (६८ हजार मेट्रिक टन) निर्यातीसाठी करार केले आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताकडून २० लाख गाठींची निर्यात केली जाईल, असा अंदाज आहे. याआधी देशातून १४ लाख गाठींची निर्यात होईल, असा अंदाज होता. काही व्यापाऱ्यांच्या मते निर्यात २५ लाख गाठींहून अधिक होऊ शकते.

उत्पादन ७.७ टक्के कमी
■ जगभरातील बाजारांमध्ये कापसाची वाढलेली मागणी आणि वाढलेली निर्यातक्षमता याचा लाभ देशाला मिळताना दिसत आहे; परंतु दुसरीकडे कापसाचे स्थानिक उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालल्याने निर्यातीवर दबाव येऊ शकतो.
■ कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या अंदाजानुसार, २०२३-२४ या वर्षात भारतातील कापसाचे उत्पादन ७.७ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. २००७-०८ नंतर कापूस उत्पादनाचा हा नीच्चांक आहे.

का वाढेल कापूस निर्यात? कारणे काय?
प्रमुख निर्यातदारांच्या तुलनेत भारतीय कापूस स्वस्त आहे. प्रमुख निर्यातदारांमध्ये अमेरिका आणि ब्राझील या देशांचा समावेश आहे. या दोन्ही देशांशी भारताचे सलोख्याचे संबंध आहेत. यामुळे कापूस निर्यातीला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Good news for farmers.. Good condition for cotton export, worldwide demand for our cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.