Join us

ऐन सणासुदीत मोगरा उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस; दर गेला ८०० रुपये किलोवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 09:57 IST

mogra ful bajar bhav गुढीपाडवा, लग्नसराई आणि रमजान ईदनिमित्त विविध फुलांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अहिल्यानगर येथे गुलाबाची फुले २०० रुपये तर, मोगऱ्याच्या एक किलो फुलांसाठी ८०० रुपये मोजावे लागत आहेत.

योगेश गुंडकेडगाव : गुढीपाडवा, लग्नसराई आणि रमजान ईदनिमित्त विविध फुलांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अहिल्यानगर येथे गुलाबाची फुले २०० रुपये तर, मोगऱ्याच्या एक किलो फुलांसाठी ८०० रुपये मोजावे लागत आहेत.

त्यामुळे गेल्या महिन्याच्या तुलनेत आता भाव वाढले असून, सध्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. माळीवाडा येथे गणपतीच्या दर्शनासाठी रोज शेकडो भाविक येतात.

हे भाविक विविध प्रकारची फुले खरेदी करून देवाला अर्पण करतात. परंतु, उन्हाळ्याची चाहूल लागताच झेंडू, शेंवती, मोगरा, गुलाब आदी फुलांची आवक कमी होऊन किमतीमध्ये वाढ होते.

तसेच, लग्नसराई असल्यामुळे गुलाबाच्या फुलांच्या हारालाही अधिक मागणी असते. दरवर्षी मोजक्याच शेतकऱ्यांकडून फुलांची शेती केली जाते. परिणामी, भाववाढ होते.

बाजारातील फुलांचे भावप्रकार - भाव किलोमध्येगुलाब - २०० रुपयेशेवंती - ८० रुपयेमोगरा - ८०० रुपयेझेंडू - ६० रुपयेनिशिगंधा - १२० रुपयेगलांडा - ३० रुपयेजास्वंद - १५ रुपये नग

फुलांना अधिक मागणी१) सध्या लग्नसराई व सणासुदीत हार, पुष्पगुच्छांची ५० टक्क्यांनी मागणी वाढली आहे. यात प्रामुख्याने गुलाब, मोगरा फुलांना अधिक मागणी आहे. परंतु, त्या तुलनेत आवक कमी आहे. परिणामी, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणांहून फुले आणावी लागत आहे.२) सध्या फुलांच्या भावात वाढ झाली आहे. आगामी दोन महिने हे दर कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले. उन्हाळ्यात लग्नसराईमुळे आगामी दोन महिने फुलांचे २० टक्क्यांनी भाव वाढणार असल्याचे फूल विक्रेते नागेश्वर इंगळे यांनी सांगितले आहे.

फुलांची आवक घटलीउन्हाची तीव्रता व उपलब्ध पाण्याची कमतरता यामुळे नगर बाजार समितीत फुलांची आवक घटली आहे. सध्या बाजारात शेवंती, झेंडू, गुलाब, गुलछडी, गलांडा, अस्टर, बिजली या फुलांची आवक थोड्याफार प्रमाणात सुरू आहे.

सध्या लग्नसराईसाठी बुके आणि हारांना अधिक मागणी आहे. यात १५० पासून ते ५०० रुपयांपर्यंत बुके उपलब्ध आहेत. तसेच, वधु-वरांना घालण्यासाठी लागणारे हार २ हजारांपासून पुढे तयार करून दिले जातात. यात मोगरा आणि गुलाबाच्या फुलांचा हार अधिक महाग आहे. - तुषार मेहेत्रे, फूल विक्रेते

दहा वर्षांपासून फूल शेती करीत आहेत. यंदा भरपूर पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहिल्यामुळे विहिरींची पाणीपातळी वाढली. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तीन एकरात विविध प्रकारच्या फुलांची लागवड केली आहे. - नामदेव बेरड, फूल उत्पादक शेतकरी 

अधिक वाचा: खोरच्या युवा शेतकऱ्याचा कलिंगड उत्पादनात विक्रम; आंतरपीक म्हणून मिरचीचा यशस्वी प्रयोग

टॅग्स :फुलंशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डफुलशेतीरमजानरमजान ईदलग्न