Lokmat Agro >बाजारहाट > Ganpati Visarjan Kanda Rates : विसर्जनाच्या दिवशी कांद्याला मिळाला 'एवढा' दर! जाणून घ्या सविस्तर

Ganpati Visarjan Kanda Rates : विसर्जनाच्या दिवशी कांद्याला मिळाला 'एवढा' दर! जाणून घ्या सविस्तर

Ganpati Visarjan Kanda Rates: Onion got 'this much' price on the day of Visarjan! Know the details | Ganpati Visarjan Kanda Rates : विसर्जनाच्या दिवशी कांद्याला मिळाला 'एवढा' दर! जाणून घ्या सविस्तर

Ganpati Visarjan Kanda Rates : विसर्जनाच्या दिवशी कांद्याला मिळाला 'एवढा' दर! जाणून घ्या सविस्तर

आज राज्यभर गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असून दुसरीकडे राज्यातील बऱ्याच बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली होती.

आज राज्यभर गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असून दुसरीकडे राज्यातील बऱ्याच बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली होती.

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Onion Rates : आज राज्यभरात गणपती विसर्जनाचा उत्साह असून दुसरीकडे राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. लाल, लोकल, नं.१, नं.२, नं. ३, पांढरा आणि उन्हाळी कांद्याची आवक झाली असून सर्वांत जास्त आवक ही राहूरू वांबोळी बाजार समितीमध्ये ६ हजार ८१० क्विंटल एवढी झाली होती. 

आजच्या म्हणजेच गणपती विसर्जनाच्या दिवशी कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, सांगली, शेवगाव, लासलगाव, राहूरी या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली होती. तर सर्वांत कमी किमान दर हा १०० रूपये एवढा होता. शेवगाव आणि छत्रपती संभाजीनगर बाजार समित्यांमध्ये सर्वांत कमी किमान दर मिळाला.

आजच्या दिवशीच्या कमाल दराचा विचार केला तर अमरावती आणि चंद्रपूर बाजार समित्यांमध्ये कांद्याला आजच्या दिवसातील सर्वाधिक दर मिळाला असून या ठिकाणी कमाल दर हा २ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल एवढा होता. तर याच बाजार समित्यामध्ये १९०० रूपये आणि २४०० रूपये सरासरी दर मिळाला.

संपूर्ण राज्यातील कांद्याच्या दराचा विचार केला तर कृषी पणन मंडळाच्या अद्ययावत माहितीनुसार आज सर्वांत कमी सरासरी दर हा शेवगाव बाजार समितीमध्ये ४५० रू. एवढा मिळाला. तर सर्वांत जास्त सरासरी दर हा चंद्रपूर बाजार समितीमध्ये २ हजार ४०० रू. एवढा मिळाला.

आजचे सविस्तर कांद्याचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/09/2025
कोल्हापूर---क्विंटल255450018001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल18901001200650
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल320180028002400
विटा---क्विंटल40100017001500
धाराशिवलालक्विंटल44110016001350
नागपूरलालक्विंटल1000100016001450
वडूजलालक्विंटल60100020001500
हिंगणालालक्विंटल2200020002000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल289100028001900
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल338150018001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल14100020001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल73240016001000
वाईलोकलक्विंटल15100020001600
मंगळवेढालोकलक्विंटल2840014501300
शेवगावनं. १क्विंटल2230130016001450
शेवगावनं. २क्विंटल183080012001050
शेवगावनं. ३क्विंटल799200700450
नागपूरपांढराक्विंटल680150020001875
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल347250015501270
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल681010017001100

Web Title: Ganpati Visarjan Kanda Rates: Onion got 'this much' price on the day of Visarjan! Know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.