Join us

Fruits Market : पंजाबमधून आवक होत असलेला 'किन्नू' खातोय भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:58 IST

Fruits Market Rate Update : मागील काही दिवसांपासून मोसंबीसारखे दिसणाऱ्या 'किन्नू' नावाची मोसंबी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.

आकाश सावंत

बीड शहरातील रुग्णालयासमोर चौकात हातगाड्यांवर फळे विकल्या जात आहेत. मागील काही दिवसांपासून मोसंबीसारखे दिसणाऱ्या 'किन्नू' नावाची मोसंबी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. सध्या बीडच्या बजारपेठेत नागपूरची संत्री तुरळक दिसते.

एरव्ही मोसंबीपेक्षा जास्त भाव न खाणारा 'किन्नू' आता चांगलाच भाव खात आहे. हे फळ आता ७० ते ८० रुपये किलोने विकल्या जात आहे. 'किन्नू' आकर्षक असल्याने शहरवासी हे आरोग्यदायी फळ मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत.

येथे होते लागवड

'किन्नू' फळाची लागवड पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर राज्यात होते. येथील हवामान किन्नू उत्पादनासाठी सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात लागवड होते.

दोन्हीत फरक काय ?

बाजारातील हातगाड्यांवर 'किन्नू' मोसंबी म्हणूनच विकल्या जात आहे. अनेक ग्राहक असे आहेत त्यांना मोसंबी व किन्नूमधील फरक माहीत नाही.

• मोसंबी व 'किन्नू' हे दोन्ही फळ दिसायला सारखेच असतात. दोन्ही मधील तफावत पटकन लक्षात येत नाही.

काय आहे 'किन्नू' मध्ये ?

• मोसंबी आणि 'किन्नू' दोन्हीही वेगवेगळी लिंबूवर्गीय फळे आहेत.

• यात व्हिटॅमिन, अँटीऑक्सिडेंट आणि खनिज जास्त प्रमाणात आढळतात.

• मोसंबीची साल ही पातळ असते व वजनातही हलकी असते. तर किन्नूची साल ही थोडी जाड असते व फळ थोडे वजनदार आहे. ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

बाजारपेठेत भाव काय ? (रुपये/प्रतिकिलो)

मोसंबी - ४०-५०किन्नू - ७०-८०

मोसंबीची आवक

यंदा बाजारात नागपूरच्या मोसंबीची आवक कमी झाली आहे. मात्र पंजाबच्या 'किन्नू'ची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. ग्राहकांमध्ये रसवंती विक्रेत्यांमध्ये या फळाची मोठी मागणी आहे. 'किन्नू'चा ग्राहक ज्यूस करून पित आहेत. तसेच त्याच्या भावात देखील वाढ झाल्याचे दिसून येत आहे. - शेख अरबाज, विक्रेता.

हेही वाचा : कुंभमेळा ठरतोय केळीला वरदान; उत्पादक शेतकऱ्यांत समाधानाची लाट

टॅग्स :बाजारफळेमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरी