Join us
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासात प्रथमच मालदांडी ज्वारीला विक्रमी दर; वाचा प्रतिक्विंटल कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 10:51 IST

maldandi jwari market यंदा गहू, मका, बाजरी यांसारख्या पिकांच्या तुलनेत ज्वारीला अधिक भाव मिळत असून, मालदांडी ज्वारीला विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे.

तेल, चटणी आणि कांदा भाकरी यावर दिवस काढणाऱ्या सर्वसामान्याला आता या वस्तूंच्याही महागाईची झळ बसू लागली आहे.

ज्वारीचे उत्पादन घटले तर मिरचीला अवकाळीचा दणका बसला. इराण अमेरिका युध्दामुळे खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत.

मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीने आघाडी घेतली आहे.

इतिहासात प्रथमच ज्वारीला प्रतिक्विंटल तब्बल ४ हजार ५०० रुपयांपासून ते ५ हजार ३०० पर्यंत उच्चांकी दर मिळाला आहे.

यंदा गहू, मका, बाजरी यांसारख्या पिकांच्या तुलनेत ज्वारीला अधिक भाव मिळत असून, मालदांडी ज्वारीला विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे.

उत्तम प्रतीच्या ज्वारीला साडेचार हजार रुपयांपर्यंत दर मिळत असून, सरासरी दर्जाच्या ज्वारीस ४५०० रुपयांपासून भाव मिळत आहे.

शेतकऱ्यांनी मालाची गुणवत्ता टिकवून ठेवली तर पुढील काही काळही ज्वारीला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.

मागील काही वर्षांपासून अपेक्षित दर न मिळाल्याने ज्वारी उत्पादक शेतकरी नाराज होते. मात्र, यंदा परिस्थितीती बदलली असून ज्वारीला चांगले दिवस आले आहेत.

चांगल्या प्रतीच्या मालाला स्पर्धात्मक दर◼️ बाजारातील स्थिती स्पष्ट करताना मंगळवेढ्यातील आडत व्यापारी पांडुरंग नकाते म्हणाले, यंदा ज्वारीचे उत्पादन कमी आहे.◼️ मात्र, दर्जात मोठी सुधारणा दिसत आहे. बाजारात मागणी सातत्याने वाढत असून, चांगल्या प्रतीच्या मालाला स्पर्धात्मक दर मिळत आहेत.

कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील ज्वारीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/04/2026
सिन्नर - हिवरगांव---क्विंटल1270027002700
पाचोरा- भदगाव---क्विंटल1244200026502351
सिल्लोड- भराडी---क्विंटल2191119111911
जळगावदादरक्विंटल49256532003100
पाचोरादादरक्विंटल30260036003000
धुळेहायब्रीडक्विंटल933170025702450
जळगाव - मसावतहायब्रीडक्विंटल207220025502350
नागपूरहायब्रीडक्विंटल3280030002950
छत्रपती संभाजीनगरहायब्रीडक्विंटल206190045994300
अजनगाव सुर्जीहायब्रीडक्विंटल1150017001600
शेवगावहायब्रीडक्विंटल48220030002200
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल9300030003000
धडगावहायब्रीडक्विंटल41195022502100
अमरावतीलोकलक्विंटल1160020001800
मुंबईलोकलक्विंटल2626260065005150
सोलापूरमालदांडीक्विंटल43386044504140
पुणेमालदांडीक्विंटल695520060005600
बीडमालदांडीक्विंटल185180135503348
वडूजमालदांडीक्विंटल200400045004250
परांडामालदांडीक्विंटल12316041004000
मालेगावपांढरीक्विंटल30182524002311
पाचोरापांढरीक्विंटल2000200026502351
औराद शहाजानीपांढरीक्विंटल7150024761988
मुरुमपांढरीक्विंटल8250028002600
तुळजापूरपांढरीक्विंटल1000320045004000
दुधणीपांढरीक्विंटल75267543453568
माजलगावरब्बीक्विंटल560220039503300
पैठणरब्बीक्विंटल17290043753700
निलंगारब्बीक्विंटल97250041003600
जालनाशाळूक्विंटल1807240047003700
देउळगाव राजाशाळूक्विंटल12150129002600

अधिक वाचा: शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठीचे अनुदान आले; तुमच्या तालुक्याला किती निधी? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Maldaandi Jowar fetches record price first time ever in history.

Web Summary : Maldaandi Jowar achieves unprecedented rates, reaching ₹5,300/quintal. Farmers are elated as quality produce fetches competitive prices amidst reduced yields. Mangalwedha market leads, offering hope for sustained high prices if quality is maintained.
टॅग्स :ज्वारीबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीशेतीसोलापूर