Join us

Flower Market : नवरात्रौ उत्सवानिमित मागणी वाढल्याने फुलांचे दर वधारलेले; शेतकऱ्यांत समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 15:19 IST

नवरात्री आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या मागणीत वाढ झाल्याने यंदा फूल उत्पादक शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. 

जालना जिल्ह्यातील धावडा व वालसावंगी येथील शेतकऱ्यांनी यंदा झेंडूच्या रोपांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. ज्यामुळे परिसरात बहरलेल्या फुलांचे चित्र दिसून येत आहे. नवरात्री आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या मागणीत वाढ झाल्याने यंदा फूल उत्पादक शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. 

सध्या बाजारात झेंडूची फुले ८० ते १०० रुपये प्रति किलोच्या दराने विकली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळत आहे. गेल्या वर्षी फुलांचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना फुले फेकून देण्याची वेळ आली होती; परंतु यंदा समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकरी आनंदी दिसून येत आहे. 

... असे आहेत फुलांचे भाव

गलांडा - ५० ते १०० रुपयेगुलाब - १०० ते १२० रुपयेकाकडा - २०० ते ३०० रुपयेनिशिगंध - १०० ते १५० रुपयेशेवंती - १५० ते १८० रुपयेझेंडू - ८० ते १०० रुपये

हेही वाचा - Varsha's Desi Cow Goshala : सेंद्रिय प्रकल्पातून गोशाळेला स्वयंअर्थपूर्ण करणाऱ्या वर्षाची वाचा प्रेरणादायी यशकथा

टॅग्स :फुलंबाजारनवरात्रीजालनामराठवाडाशेतकरीशेतीशेती क्षेत्र