Join us

दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी घेतला सोयाबीनची विक्री रोखत सावधगिरीचा पवित्रा; आवकेत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 15:58 IST

Soybean Market update : एप्रिल महिन्याच्या प्रारंभी सोयाबीनच्या दर वाढल्यानेबाजार समितीत आवक वाढली होती. मात्र, सोयाबीनचे दर पुन्हा ४४०० रुपयांपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांनी विक्री थांबविल्याचे चित्र आहे. परिणामी, रिसोड बाजार समितीत पाच दिवसांत सोयाबीनची आवक ७०० क्विंटलने घटली आहे.

एप्रिल महिन्याच्या प्रारंभी सोयाबीनच्या दर वाढल्याने रिसोड बाजार समितीत आवक वाढली होती. मात्र, सोयाबीनचे दर पुन्हा ४४०० रुपयांपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांनी विक्री थांबविल्याचे चित्र आहे. परिणामी, रिसोड बाजार समितीत पाच दिवसांत सोयाबीनची आवक ७०० क्विंटलने घटली आहे.

सध्या सोयाबीनच्या दरात तेजी दिसून येत आहे. त्यामुळे खरिपाच्या तयारीपूर्वी शेतकरी साठवून ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत. मात्र, दरात सातत्याने होणारा चढ-उतार यामुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरही सोयाबीनच्या दरात होत असलेली घसरण शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री रोखत सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे.

दरात चढ-उतार कायमच !

राज्यात आज एकूण १४०२७ क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक असलेल्या लातूर, अकोला बाजारात सोयाबीनला ४००० ते ४२०० असा सरासरी दर मिळाला. तर कमी आवकेच्या गंगाखेड, भोकर, देउळगाव राजा बाजारात ४००० ते ४५०० रुपयांचा प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील सोयाबीन आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/04/2025
तुळजापूर---क्विंटल50430043004300
अमरावतीलोकलक्विंटल990400042504125
नागपूरलोकलक्विंटल585400043604270
लातूरपिवळाक्विंटल9359404045404400
अकोलापिवळाक्विंटल1643357043854200
चिखलीपिवळाक्विंटल290385045004175
भोकरपिवळाक्विंटल21432543254325
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल91380043004050
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल450368543154000
दिग्रसपिवळाक्विंटल150383044504150
गंगाखेडपिवळाक्विंटल8450046004500
देउळगाव राजापिवळाक्विंटल20410041004100
निलंगापिवळाक्विंटल200420044004300
पालमपिवळाक्विंटल75445144514451
सिंदीपिवळाक्विंटल95385043004200

हेही वाचा : शेतकरी ताई कामाच्या ओघात स्वतःकडे दुर्लक्ष करू नको; 'या' कर्करोगाचे महिलांमध्ये प्रमाण वाढले

टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रशेतकरीवाशिमपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्ड