Join us

दसरा-दिवाळी होणार आणखी गोड, सुकामेव्याचे दर आले आवाक्यात; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:27 IST

Dryfruit Market सुकामेवा वस्तूनिहाय दरामागे सरासरी १५ पासून ११० रुपयांपर्यंत फरक राहणार आहे. आरोग्यासाठी सुकामेवा व त्यापासून बनवलेले पदार्थ पौष्टिक असतात.

केंद्र सरकारने २२ सप्टेंबरपासून विविध वस्तूंवरील जीएसटी कमी केल्याने बाजारात काही प्रमाणात स्वस्ताई दिसत आहे. ड्रायफ्रूटवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांपर्यंत खाली आणल्याने दर कमी झाले आहेत.

वस्तूनिहाय दरामागे सरासरी १५ पासून ११० रुपयांपर्यंत फरक राहणार आहे. आरोग्यासाठी सुकामेवा व त्यापासून बनवलेले पदार्थ पौष्टिक असतात.

मात्र, सुक्या मेव्याचे दर अधिक असल्याने सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असतात. आता जीएसटी ७ टक्क्यांनी कमी केल्याने खजूर, काजू, बदाम, पिस्ता, मनुके, अंजीर, आक्रोड, जर्दाळू, आदी सुकामेवा स्वस्त झाला आहे.

दसरा-दिवाळी आणखी गोडदसरा व दिवाळीत सुक्यामेव्याचा वापर वाढतो. मिठाईच्या माध्यमातून प्रत्येकाच्च्या घरी सुकामेवा जातो. दरात थोडी कपात झाल्याने यंदा दसरा, दिवाळीची मिठाई आणखी गोड होणार आहे.

सुकामेव्याचे दर (प्रतिकिलो रुपये)पिस्ता - १५०० ते १७००मगज बीज - १४०० ते १५००आक्रोड - १०५० ते १७००अंजीर - ६५० ते ८००काजू - ९०० ते १८००बदाम - ५५० ते ८००मनुके - ३७५ ते ४१०खारीक -  २०० ते २५०खजूर - १०५ ते ५५०

मेवा खाण्याचे फायदे१) रोगप्रतिकारशक्ती वाढवतेसुक्या मेव्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक रोग प्रतिकार शक्ती वाढवून व्हायरल आणि फ्लूपासून बचाव करतात.२) ऊर्जा आणि ताकद देतेहिवाळ्यात शरीराला अधिक ऊर्जेची गरज असते. सुकामेवा ऊर्जा आणि ताकद टिकवते.३) हाडे मजबूत करतेकाजू आणि बदाममध्ये कॅल्शियम असते, जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते.४) पचनक्रिया सुधारतेमनुका यांसारखे सुकामेवा पचनास मदत करतात. त्यांना भिजवून खाल्ल्याने फायटिक अ‍ॅसिड कमी होते.५) हृदय आणि मेंदूचे आरोग्य सुधारतेबदाम, अक्रोड आणि खजूर यांसारखे सुकामेवा हृदय आणि मेंदूचे आरोग्य सुधारतात.

अधिक वाचा: भूमी अभिलेख विभागातील भू-करमापकांच्या ९०३ जागांसाठी भरती; कुठे किती जागा? कसा कराल अर्ज?

English
हिंदी सारांश
Web Title : Dry Fruit Prices Drop: Sweeter Dussehra and Diwali Ahead!

Web Summary : GST reduction on dry fruits makes them affordable. Prices of cashews, almonds, dates, and other dry fruits have decreased, promising a sweeter festive season with increased accessibility and health benefits.
टॅग्स :फळेअन्नजीएसटीदसरादिवाळी 2024आरोग्यहेल्थ टिप्सकेंद्र सरकार