नवरात्र उत्सवात देवीची घटस्थापना आज सोमवारी (दि. २२) होत आहे. त्यानिमित्ताने सोमवारपासून देशात केंद्र सरकारनेजीएसटीचे दर कमी केले आहे.
यामध्ये ड्रायफ्रूट सुकामेव्याचे दर १२ टक्क्यांवरून जीएसटी ५ टक्के करण्यात आले आहे. यामुळे खजूर, बदाम, पिस्ता, अंजीर, आक्रोड, जर्दाळू आदी सुकामेवा प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त होणार आहे.
नवरात्र उत्साहात मोठ्या प्रमाणात उपवास केला जातो. नवरात्रात खजुराला मागणी जास्त असते. आता खजूर ३५० वरून ३१५ रुपये प्रतिकिलो झाले आहे.
सुकामेवा स्वस्त झाल्याने सामान्यांच्या आवाक्यात दर आले आहेत. त्यामुळे सामान्यांची दसरा-दिवाळीही यंदा गोड होणार आहे.
केंद्र सरकारने जीएसटीचे दर १२ टक्क्यांवरुन ५ टक्के केल्यामुळे खजूर, बदाम, पिस्ता प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त झाले.
सुकामेव्याचे दर आजपासून असे असतीलप्रकार | आताचे दर प्रतिकिलो | जीएसटी दर कमी दरखजूर | ३३६ | ३१५बदाम | ८९६ | ८४०पिस्ता १,२५० | १,१५०आक्रोड | १,२५० | १,१५०अंजीर | १,५०० | १,३००खारीक | २८० | २५०जर्दाळू | ५०० | ४००
केंद्र सरकारने १२ टक्क्यांवरून ५ टक्के जीएसटी केल्याने ड्रायफ्रूट दरात घट झाली असून ३६० चा खजूर २७० पर्यंत आला. सामान्यांची दिवाळी गोड होईल. - नवीन गोयल, ड्रायफ्रूट व्यापारी व दी पूना मर्चट चेंबर सदस्य
नवरात्र उत्साहात आमच्या घरामध्ये नऊ दिवस उपवास केला जातो. यावर्षी उपवास केल्यामुळे, ड्रायफ्रूट स्वस्त मिळाल्याने दिवाळी गोड होणार आहे. - नकुल जोशी, नागरिक
अधिक वाचा: शेतकऱ्याच्या कन्येला व्हायचं होतं शिक्षिका पण झाली आशियातली पहिली महिला रेल्वेचालक