Join us

Draksh Bajar Bhav : पुणे मार्केट यार्डात हंगामपूर्व द्राक्षांची आवक कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 11:27 IST

गोड-आंबट चवीच्या द्राक्षांची चव यंदा पुणेकरांना हंगामापूर्वीच चाखता येणार आहे. मार्केट यार्डातील फळविभागात हंगामपूर्व द्राक्षांची आवक सुरू झाली आहे.

पुणे: गोड-आंबट चवीच्या द्राक्षांची चव यंदा पुणेकरांना हंगामापूर्वीच चाखता येणार आहे. मार्केट यार्डातील फळविभागात हंगामपूर्व द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. घाऊक बाजारात ९ किलोच्या कॅरेटला २०० ते १,००० रुपये भाव मिळत आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात दररोज दीड ते दोन टन द्राक्षांची आवक होत आहे. जिल्ह्यातील बारामती आणि सातारा जिल्ह्यातील फलटण भागातून द्राक्षे बाजारात दाखल होत आहे.

घाऊक बाजारात द्राक्षाच्या ९ किलोच्या कॅरेटला ९०० ते १,००० रुपये, तर ५ किलोच्या निवडक मालाच्या पार्किंगला ६०० ते ८०० रुपये भाव मिळत आहे. साधारणपणे १५ डिसेंबर ते एप्रिल अखेरपर्यंत द्राक्षांचा हंगाम असतो.

मात्र, अलीकडच्या काळात काही शेतकरी आगाप माल बाजारात आणत असतात. तशी आवक सुरू झाली आहे. बाजारात दाखल झालेल्या मालाची महाबळेश्वर, लोणावळा या पर्यटन क्षेत्रातील विक्रेते आणि गुजरात, अहमदाबाद येथील व्यापाऱ्यांनी खरेदी केली.

पोषक वातावरणामुळे दर्जा चांगला आहे. पीकही चांगले आहे. हळूहळू आवक वाढत जाणार आहे. सुरुवातीलाच मागील वर्षीपेक्षा २० टक्के जास्त भाव मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. राज्यासह परराज्यातील बाजारपेठामधून मागणी राहणार आहे.

अधिक वाचा: Phule Sugarcane 11082 : आला हा ऊसाचा लवकर पक्व होणार वाण वाचा सविस्तर

टॅग्स :द्राक्षेबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपुणेशेतीशेतकरी