Join us

Draksh Bajar Bhav : तासगावमध्ये आगाप द्राक्षपिकास मिळाला सर्वाधिक दर; पेटीला कसा मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:08 IST

तासगाव तालुक्यात आगाप द्राक्ष छाटण्यांचा हंगाम सुरू झाला असून, तासगाव पूर्व भागातील सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या आगाप छाटण्यांची द्राक्ष विक्री सुरू झाली आहे. परप्रांतीय व्यापाऱ्याकडून द्राक्ष खरेदी सुरू आहे.

तासगाव : तासगाव तालुक्यात आगाप द्राक्ष छाटण्यांचा हंगाम सुरू झाला असून, तासगाव पूर्व भागातील सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या आगाप छाटण्यांची द्राक्ष विक्री सुरू झाली आहे. परप्रांतीय व्यापाऱ्याकडून द्राक्ष खरेदी सुरू आहे.

आगाप द्राक्षपेटीला ४४० रुपये उच्चांकी दराची सलामी मिळाली आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना अच्छे दिन आले आहेत. तासगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहेत. त्यात तासगाव पूर्व भागात सप्टेंबर महिन्यात आगाप छाटण्या घेतल्या जातात.

मनेराजुरी, सावर्डे, गव्हाण, अंजनी, सावळज व डोंगरसोनी या गावांतून आगाप छाटणी घेतली जाते. सप्टेंबर महिन्यातील छाटणी घेतलेली द्राक्षे आता परिपक्व झालेली आहेत आणि विक्रीयोग्य झाली आहेत.

सुपर सोनाका, माणिक चमन, कृष्णा सीडलेस, एसएस या जातीच्या वाणास मोठी मागणी वाढू लागली आहे. परप्रांतीय दलाल प्लॉट खरेदीसाठी द्राक्ष बागातून फिरू लागले आहेत.

यावर्षी सप्टेंबर महिना छाटणी घेतल्यापासून सारखा पाऊस सुरू असल्याने द्राक्षबागेच्या त्यांनी छाटण्या मोठ्या प्रमाणात घेतलेल्या नाहीत. अनेक द्राक्षबागांचे पावसाने नुकसान झालेले आहे. 

मणेराजुरी, सावळजमध्ये व्यापारी दाखलसुमारे ३०० ते ४५० रुपये चार किलोस सरासरी दराने द्राक्ष विक्री होऊ लागली आहेत. त्यामुळे द्राक्ष कमी असली तरीही चांगला दर मिळाल्यामुळे प्लॉटचे पैसे होत आहेत. त्यामुळे द्राक्ष बागायतदारात समाधानाचे वातावरण आहे. अनेक व्यापारी मणेराजुरी व सावळज भागात दाखल झाले असून, त्यांच्याकडून प्लॉट खरेदी सुरू झाली आहे.

टॅग्स :द्राक्षेबाजारसांगलीमार्केट यार्डशेतीशेतकरीफलोत्पादन