Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > लग्नसराई, यात्रा, सण-उत्सवांचा हंगाम असूनही फुल बाजार मंदीत; शेतकऱ्यांनी थांबवली तोडणी

लग्नसराई, यात्रा, सण-उत्सवांचा हंगाम असूनही फुल बाजार मंदीत; शेतकऱ्यांनी थांबवली तोडणी

Despite the wedding, pilgrimage, and festival season, the flower market is in a slump; farmers have stopped harvesting | लग्नसराई, यात्रा, सण-उत्सवांचा हंगाम असूनही फुल बाजार मंदीत; शेतकऱ्यांनी थांबवली तोडणी

लग्नसराई, यात्रा, सण-उत्सवांचा हंगाम असूनही फुल बाजार मंदीत; शेतकऱ्यांनी थांबवली तोडणी

मार्च-एप्रिल हा लग्नसराई, यात्रा व सण-उत्सवांचा हंगाम असल्याने फुलांना चांगली मागणी आणि बाजारभाव मिळण्याची अपेक्षा असते. मात्र, यंदा मुंबईच्या दादर फूलबाजारात भाव कोसळल्याने मीना खोऱ्यातील फूलशेती करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

मार्च-एप्रिल हा लग्नसराई, यात्रा व सण-उत्सवांचा हंगाम असल्याने फुलांना चांगली मागणी आणि बाजारभाव मिळण्याची अपेक्षा असते. मात्र, यंदा मुंबईच्या दादर फूलबाजारात भाव कोसळल्याने मीना खोऱ्यातील फूलशेती करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

शरद मनसुख 

मार्च-एप्रिल हा लग्नसराई, यात्रा व सण-उत्सवांचा हंगाम असल्याने फुलांना चांगली मागणी आणि बाजारभाव मिळण्याची अपेक्षा असते. मात्र, यंदा मुंबईच्या दादर फूलबाजारात भाव कोसळल्याने पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील मीना खोऱ्यातील फूलशेती करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

कमी दरामुळे अनेकांनी फुलांची तोडणीच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सावरगाव, खिलारवाडी, निमदरी, निमगाव, वडज, पारुडे, वैष्णवधाम व कुसूर या भागात मोठ्या प्रमाणावर फूलशेती केली जाते.

सध्या झडूला प्रतिकिलो केवळ १० ते २० रुपये भाव मिळत असून, परपल व मेघना जातींना सुमारे ३० रुपये, तर शेवेतीला ३० ते ४० रुपये दर मिळत आहे. या दरात उत्पादन खर्च तर दूरच, मजूरीही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

दीड-दोन महिने कष्ट करून फूलशेती केली, पण बाजारभाव नसल्याने भांडवलही वसूल होत नाही. - शेखर पाबळे, शेतकरी, साचगात.

अवकाळी पावसाचा फटका

एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झेंडू पिकावर रोगराई वाढली. त्यामुळे औषध फवारणीचा खर्च वाढला असून, उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. मात्र, त्याच्या तुलनेत बाजारभाव अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे.

तोडणी थांबवण्याची वेळ

जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात झेंडूला ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दर मिळत होता. परंतु, एप्रिलमध्ये हा दर घसरून १० ते २० रुपयांवर आला आहे. वाहतूक, हमाली व दलालीचा खर्च वजा केल्यानंतर हातात काहीच राहत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी फुले तोडणेच बंद केले आहे. सध्या शेतकरी बाजारभाव वाढण्याख्या प्रतीक्षेत आहेत.

मागील तीन वर्षांचा झेंडू दर (प्रतिकिलो)

२०२३ :- ५० ते ६० रुपये
२०२४ :- ४० ते ५० रुपये
२०२५ :- ४० ते ५० रुपये
२०२६ :- १० ते २० रुपये

मार्चमध्ये काहीसा चांगला दर मिळाला; मात्र एप्रिलमध्ये भाव घसरले. पुढील काही दिवसांत दर वाढण्याची शक्यता आहे. - सुभाष मनसुख, फूलविक्रेते दादर फूलमार्केट मुंबई.

हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर 

Web Title : त्योहारी सीज़न में भी फूल बाजार में गिरावट, किसानों को नुकसान

Web Summary : शादी के मौसम में भी फूलों की मांग कम होने से जुन्नर के किसानों को नुकसान हो रहा है। कम कीमत के कारण किसान फसल काटना बंद करने को मजबूर हैं। बेमौसम बारिश से फसल भी खराब हुई है। किसान कीमतों के बढ़ने का इंतजार कर रहे हैं।

Web Title : Flower Market Slump Hits Farmers Despite Festive Season Demand

Web Summary : Junnar farmers face losses as flower prices plummet despite wedding season demand. Low rates force farmers to halt harvesting due to rising costs and disease from unseasonal rains. Farmers await price recovery after January highs crashed to rock bottom.