Join us

उष्णतेच्या तीव्रतेने मागणी वाढली; वाचा लिंबू खातोय का बाजारात भाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 18:03 IST

Lemon Market Price : उन्हाळ्यामध्ये लिंबाची मागणी प्रचंड वाढते मात्र पाणीटंचाई सोबत इतर काही प्रवाही समस्यांमुळे बाजारामध्ये स्थानिक लिंबू अपेक्षित उपलब्ध होत नाही आणि लिंबू दरवर्षी उन्हाळ्यामध्ये भाव खाऊन जातो.

सर्वत्र उष्णतेचा तडाखा वाढलेला दिसून येत आहे. तसेच गावोगावी रस्त्यालगत ऊस रसवंती सुरू झाल्या आहेत. "लिंबू टाकून, द्या बरं" अशी भावनिक हाक या प्रत्येक रसवंती वर रसवंती चालकाला ग्राहकांची असते.

दरम्यान नातेवाईकांच्या पाहुणचारांमध्ये देखील उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिंबू सरबत ची मागणी वाढलेली असते.

या सर्वांचा परिणाम बाजारावर होतो, ज्यातून उन्हाळ्यामध्ये लिंबाची मागणी प्रचंड वाढते मात्र पाणीटंचाई सोबत इतर काही प्रवाही समस्यांमुळे बाजारामध्ये स्थानिक लिंबू अपेक्षित उपलब्ध होत नाही आणि लिंबू दरवर्षी उन्हाळ्यामध्ये भाव खाऊन जातो.

सध्या देखील बाजारात लिंबू आवक कमी असून आज रविवार (दि.१६) रोजी राज्यात ४५३ क्विंटल आवक झाली होती. ज्यास सर्वाधिक ३८४ क्विंटल आवकेच्या पुणे बाजार समितीत कमीत कमी ५०० तर सरासरी २००० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. 

तसेच पुणे-मोशी येथे ६४ क्विंटल आवक झालेल्या लिंबूला ५५०० व भुसावळ येथे आवक झालेल्या ५ क्विंटल लिंबूला ५००० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील लिंबू आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/02/2025
पुणेलोकलक्विंटल38450035002000
पुणे-मोशीलोकलक्विंटल64500060005500
भुसावळलोकलक्विंटल5450060005000
15/02/2025
कोल्हापूर---क्विंटल98300050004000
जळगाव---क्विंटल10200050003500
जुन्नर -ओतूर---क्विंटल3100050003000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल25350550450
राहूरी---क्विंटल2450060005050
श्रीरामपूर---क्विंटल5600070006550
राहता---क्विंटल3100050003000
नाशिकहायब्रीडक्विंटल14300050003500
धाराशिवकागदीक्विंटल6250055004000
सोलापूरलोकलक्विंटल57100055003000
पुणे-मोशीलोकलक्विंटल50400050004500
भुसावळलोकलक्विंटल4550060006000
कामठीलोकलक्विंटल1350045004000
टॅग्स :बाजारमार्केट यार्डशेती क्षेत्रपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीफळे