Join us
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला दुबई व श्रीलंकेतून मागणी; पारनेर बाजार समितीतून सहा कंटेनर कांदा दुबईला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 11:18 IST

Kanda Niryat पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या दर्जेदार कांद्याला दुबई व कोलंबोतून (श्रीलंका) मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.

शरद झावरेपारनेर: पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या दर्जेदार कांद्याला दुबई व कोलंबोतून (श्रीलंका) मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पारनेर बाजार समितीच्या आवारातील कांदा दुबईवारीला गेला.

पाशा ग्लोबल एक्स्पोर्ट कंपनीचे निर्यातदार अब्दुल कादर पाशा यांनी ६ कंटेनरमध्ये १८० टन कांदा दुबईला पाठवला आहे. त्यामुळे पारनेरसह श्रीगोंदा, जुन्नर, नगर तालुक्यात पिकणाऱ्या कांद्याला आखाती देशांतून मागणी वाढल्याचे दिसत आहे.

पारनेर बाजार समितीतील साईबाबा ट्रेडिंगचे प्रकाश भंडारी यांच्या माध्यमातून दुबई येथील पाशा ग्लोबल एक्सपोर्ट कंपनीने ही कांदा खरेदी केल्याचे सभापती किसनराव रासकर व सचिव सुरेश आढाव यांच्यासह संचालक मंडळाने सांगितले.

भविष्यात या ठिकाणी गोदामाची उभारणी करुन कांदा खरेदी करण्याचा मानस असल्याचे पाशा ग्लोबल एक्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक अब्दुल कादर पाशा यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात पारनेर बाजार समितीच्या माध्यमातून परदेशात कांदा निर्यात केला जाणार आहे.

दुबईला कांदा कंटेनर रवाना करताना माजी सभापती गंगाराम बेलकर, व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष मारुती रेपाळे, सचिव सुरेश आढाव, चंदन भळगट, किसन गंधाडे, एकनाथ पडवळ, चेतन भळगट उपस्थित होते.

तसेच राहुल सातपुते, नितीन तामखडे, स्वप्निल भंडारी, रावसाहेब झंजाड, माणिक खोडदे, महादू तोडकर, राजू बेलोटे, अक्षय बेलोटे आदी उपस्थित होते. कांदा व्यापार करणाऱ्या ५ ते ७ व्यापाऱ्यांनी परदेशात कांदा पाठविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

आखाती देशांकडून कांद्याला मागणी◼️ पारनेरसह संगमनेर, श्रीगोंदा, नगर, शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादकांची पसंती पारनेर बाजार समितीला आहे.◼️ श्रीलंका (कोलंबो), दुबई व आखाती देशांमध्ये येथील दर्जेदार कांद्याला मागणी आहे.◼️ त्यामुळे कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असून, डिसेंबर व जानेवारी महिन्यात विक्रमी आवक झाली.◼️ परदेशात कांद्याला मागणी असल्याने ही आनंदाची बाब असल्याचे सभापती किसनराव रासकर व सचिव सुरेश आढाव यांनी सांगितले.

आवक घटली, भाव स्थिर◼️ पारनेर बाजार समितीत बुधवारी ७१ हजार ७४२ कांदा गोण्यांची आवक झाली.◼️ गत आठवड्यात ९६ हजार कांदा गोण्यांची आवक झाली होती.

बुधवारच्या लिलावातील भाव◼️ ५ ते १० वक्कलला १६ ते १७ रुपये.◼️ एक नंबर १३ ते १५.◼️ दोन नंबर १० ते १२.◼️ तीन नंबर ६ ते ९ रुपये.◼️ गोल्टी कांद्याला ९ ते १२ रुपये किलो.

अधिक वाचा: नमो शेतकरीचा आठवा हप्ता 'या' आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता

English
हिंदी सारांश
Web Title : Parner onion demand soars; six containers shipped to Dubai.

Web Summary : Parner's high-quality onions are in demand in Dubai and Sri Lanka. Six containers, totaling 180 tons, were recently exported to Dubai, signaling increased demand from Gulf countries for onions grown in Parner and surrounding areas.
टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपारनेरशेतकरीदुबईश्रीलंका