Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजार आणि भाजीतून कढीपत्ता झाला गायब; पाच काड्यांची जुडी सुद्धा खातेय भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 09:15 IST

लांबलेला पाऊस आणि हवामान बदलामुळे कढीपत्ता लागवड आणि उत्पादनावर परिणाम झाला आहे. दिवाळीनंतर दोन महिन्यात थंडीचा परिणाम या झाडांवर झाला. पाने पिवळी पडून गळू लागल्याने बाजारात कढीपत्त्याची आवक कमी झाली आहे.

लांबलेला पाऊस आणि हवामान बदलामुळे कढीपत्ता लागवड आणि उत्पादनावर परिणाम झाला आहे. दिवाळीनंतर दोन महिन्यात थंडीचा परिणाम या झाडांवर झाला. पाने पिवळी पडून गळू लागल्याने बाजारात कढीपत्त्याची आवक कमी झाली आहे.

यामुळे एरव्ही नाममात्र भावात मिळणारा कढीपत्ता चांगलाच महागला आहे. फोडणीसाठी सढळ हाताने कढीपत्ता वापरणाऱ्या गृहिणींना हात आखडता घ्यावा लागत आहे.

कढीपत्त्याशिवाय भाजी बेचव

• आयुर्वेदानुसार आहारात तिखट, कडू आणि तुरट घटक असले पाहिजेत.

• कढीपत्ता इतर पदार्थांसोबत मिसळणारा घटक असून त्याशिवाय खाद्यपदार्थ परिपूर्ण होतच नाही.

हवामानाचा फटका बसल्याने उत्पादन घटले

कढीपत्त्याच्या झाडांवर लिफ स्पॉट मोठ्या प्रमाणात आढळत आहे. पानांवर काळे, पांढरे तसेच खवले अशा प्रकारचे ठिपके पडून पानगळतीमुळे उत्पादन घटले आहे.

आहारात कढीपत्त्याचा हा फायदा

कढीपत्ता कफ आणि पित्त दोष संतुलित करतो तसेच ताप, अतिसारात गुणकारी आहे. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम असते. डोळ्यांसाठी देखील कढीपत्त्याचा रस चांगला मानला जातो. एकूणच कढीपत्ता आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी आहे.

घरगुती ग्राहकांसह हॉटेलकडून वर्षभर मागणी

चिवडा, पोहे, वरण, भाजी, कडी, मठ्ठा, सांबर आदी आहारातील पदार्थामध्ये कढीपत्ता रोज लागतो. घरगुती ग्राहकांसह हॉटेल, भोजनालयांकडून वर्षभर मागणी असते. सध्या तुरळक विक्रेत्यांकडेच कढीपत्ता उपलब्ध आहे. त्याचे दर पाहता कढीपत्त्याचा वापर नसल्यासारखा तर काही जण नावापुरता करतात.

बीडमध्ये स्थानिक आवक

बीड तालुक्यातील बीड, लिंबारुई, नवगण राजुरी, नाळवंडी, ईट, नाथापूर, पाली परिसरातून तर लगतच्या गेवराई तालुक्यातील गावांतून बाजारात कढीपत्त्याची आवक होते. सध्या आवक घटली आहे. इतर बाजारातून आयात केले जात नाही.

बाजारात पाच रुपयांना एक जुडी

एरवी ठोक बाजारात दोन ते तीन रुपयांना जुडी मिळत होत्या. परंतु गेल्या महिन्याभरापासून आवक घटल्याने जुडीचा भाव काड्या आणि पानांनुसार पाच ते सहा रुपयांपर्यंत पोहचला आहे.

आवक घटली

तीन महिन्यांत कढीपत्त्याची आवक कमी झाली. बाजारात ३०० रुपये शेकडा जुडीचे भाव होते. सध्या ५०० ते ६०० रुपये शेकडा भाव आहे. कढीपत्त्याच्या झाडावर विघ्न पडल्याने व बाजारात विक्री होत नसल्याने शेतकरी रानातूनच विक्रीसाठी आणत नाहीत. सध्या बाजारात आवक कमी आहे. थोडे महाग असले तरी ग्राहक खरेदी करतात. - अनिल बोबडे माळी, पालेभाजी विक्रेता, बीड.

हेही वाचा : मंदीच्या लाटेत देखील 'हा' शेतकरी म्हणतोय मेथीची एक जुडी देतेय ५० रुपयांचे उत्पन्न; वाचा सविस्तर 

English
हिंदी सारांश
Web Title : Curry Leaves Disappear from Markets; Price Hikes Reported

Web Summary : Erratic weather has impacted curry leaf production, leading to scarcity and price increases. Leaf spot disease further reduces yields. Essential in Indian cuisine and Ayurveda, curry leaves are now expensive, affecting household and commercial use. Local supply dwindled, pushing prices up to ₹5-6 per bunch.
टॅग्स :भाज्याशेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्ड