Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > कापूस सोयाबीनने साठवलेली जागा खातेय भाव; मात्र पिकांना विचारायला नाही कोणी राव

कापूस सोयाबीनने साठवलेली जागा खातेय भाव; मात्र पिकांना विचारायला नाही कोणी राव

Cotton soybean storage space is precious; But there is no person to ask the crops | कापूस सोयाबीनने साठवलेली जागा खातेय भाव; मात्र पिकांना विचारायला नाही कोणी राव

कापूस सोयाबीनने साठवलेली जागा खातेय भाव; मात्र पिकांना विचारायला नाही कोणी राव

पिकांच्या उत्पन्नापेक्षा साठवणूक खर्च अधिक

पिकांच्या उत्पन्नापेक्षा साठवणूक खर्च अधिक

कापूससोयाबीनने साठवलेली जागा जर भाडेतत्वावर दिली तर त्यातून अधिक पैसे मिळतील मात्र गेल्या वर्षापासून साठवलेल्या शेतमालाला विचारायला कोणी वाली नाही. अशी अवस्था कापूस आणि सोयबिन उत्पादक शेतकरी बांधवांची झाली आहे.

शेतकऱ्यांना मालामाल करणारे पिक अशी ओळख असलेल्या कपाशीने यंदा शेतकऱ्यांची पुरती निराशा केली आहे. कापसाची खेडा खरेदी प्रती क्विंटल ७ हजार ७०० रुपयांच्या पुढे जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. सोबतच सोयाबीनचे दरही ३,८०० ते ४,४०० च्या घरात असल्याने शेतकरी पुरता हवालदिन झाला आहे.

दोन वर्षांपूर्वी डाळ व तेल वाणांची टंचाई आल्याने सरकारने तूर व सोयाबीन पेरणीचे आवाहन केले होते. केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकरी बांधवांनी कापूस बाजूला करून सोयाबीन पेरा वाढविला. ज्यातून चांगले दर मिळतील अशी अपेक्षा सर्वांना होती, परंतु सोयाबीन मातीमोल भावाने खरेदी करणे सुरू असून सोयाबीनला सध्या ३,८०० ते ४४,००० इतके निच्चांकी दर आहे.

दुसरीकडे कापसाच्या आघाडीवरही शेतकरी पुरता निराश झाला आहे. गेल्या वर्षी १० हजार प्रती क्विंटलपेक्षा अधिक भावाने विकला गेलेला कापूस यंदा आठ हजार रुपयांच्यावर जात नसल्याचे वास्तव आहे. त्यातही कापसाची खेडा खरेदी ७ हजार ७०० रुपयांनीच होत आहे. बियाणे, खते, फवारणी महागली असून, कमी दरात विक्री करणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस पीक घरातच ठेवले आहे.

कापूस आणि सोयाबीन नको रे बाबा 

कापूस व सोयाबीन हे दोन्ही नगदी पीक आहेत. परंतु या दोन्ही पिकांनी यंदा पुरती निराशा केली. त्यामुळे आगामी हंगामात 'कापूस आणि सोयाबीन नको रे बाबा' अस म्हणतांना आता शेतकरी दिसून येत आहे.  

हेही वाचा - शेतकऱ्यांनो लेकीच्या नावाने पोस्टाच्या या योजनेत खाते उघडा होईल मोठा फायदा

Web Title: Cotton soybean storage space is precious; But there is no person to ask the crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.