Lokmat Agro >बाजारहाट > Cotton Market: 'या' केंद्रातील कापूस खरेदी अखेर बंद; काय आहे कारण ते वाचा सविस्तर

Cotton Market: 'या' केंद्रातील कापूस खरेदी अखेर बंद; काय आहे कारण ते वाचा सविस्तर

Cotton Market: latest news Cotton procurement at 'this' center finally closed; Read the reason in detail | Cotton Market: 'या' केंद्रातील कापूस खरेदी अखेर बंद; काय आहे कारण ते वाचा सविस्तर

Cotton Market: 'या' केंद्रातील कापूस खरेदी अखेर बंद; काय आहे कारण ते वाचा सविस्तर

Cotton Market: वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथील सीसीआयच्या (CCI) शासकीय खरेदी केंद्रावर आतापर्यंत एक लाख क्विंटलवर कापूस खरेदी (Cotton procurement) करण्यात आली परंतू असे कारण देत त्यांनी कापूस खरेदी केंद्र बंद केले आहे.

Cotton Market: वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथील सीसीआयच्या (CCI) शासकीय खरेदी केंद्रावर आतापर्यंत एक लाख क्विंटलवर कापूस खरेदी (Cotton procurement) करण्यात आली परंतू असे कारण देत त्यांनी कापूस खरेदी केंद्र बंद केले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथील सीसीआयच्या (CCI) शासकीय खरेदी केंद्रावर आतापर्यंत एक लाख क्विंटलवर कापूस खरेदी (Cotton procurement) करण्यात आला असून, शेतकऱ्यांना (Farmer) प्रतिक्विंटल ७ हजार ४२१ रुपये दर देण्यात आला. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांची ऑनलाइन (Online) नाव नोंदणी चार दिवसांपासून बंद करण्यात आली आहे.

शिऊर बंगला येथील खासगी जिनिंगमध्ये केंद्र सरकारच्या वस्र मंत्रालयाअंतर्गत भारतीय कापूस परिषदेच्या वतीने राज्यातील काही निवडक कापूस खरेदी केंद्रे चालवली जातात.

याप्रमाणेच शिऊर बंगला येथील दोन खासगी जिनिंगमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियंत्रणाखाली ही खरेदी केंद्रे सुरू आहेत. नोव्हेंबर २०२४ पासून सुरू झालेल्या कापूस खरेदीने लाखो क्विंटलचा टप्पा पार केला आहे.

मात्र, सध्या ऑनलाइन नोंदणी करणारे पोर्टल बंद असल्याने खरेदी रखडली आहे. तालुक्यात खरीप हंगामात ७१ हजार ६८६, तर शिऊर महसूल मंडळात ५ हजार ८८८ हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली आहे. त्या तुलनेत अद्यापही मोठ्या प्रमाणावर कापसाची साठवणूक शिल्लक असण्याचा अंदाज आहे.

सीसीआयच्या नव्या नियमावलीतील बदलामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली असली तरी अनेक वेळा तांत्रिक अडचणीमुळे खरेदी बंद राहत आहे. या संबंधीच्या सूचनादेखील शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सीसीआयकडून देण्यात येतात.

कापूस विक्रीपूर्वी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली असून, कापूस विक्रीच्या एक दिवस आधी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली.

एकाच दिवसात बिल तयार झालेच पाहिजे, असा नियम आहे. दरम्यान, सुरुवातीला शंभर ते सव्वाशे आणि जानेवारीपासून दररोज नोंदणी झालेली पन्नास वाहने दिवसभरात खाली करण्यात आली. परंतु सध्या तांत्रिक अडचणीमुळे हे कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे.

तांत्रिक अडचणीमुळे घेतला निर्णय

शिऊर बंगला येथील याच शासकीय केंद्रांवर कापूस खरेदी करण्यात येत आहे.

७१ हजार ६८६ वैजापूर तालुक्यात, तर शिऊर मंडळात ५ हजार ८८८ हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली होती. त्या तुलनेत अद्यापही मोठ्या प्रमाणावर कापसाची साठवणूक अनेक शेतकऱ्यांच्या असण्याचा शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या चार महिन्यांत झाली कापूस खरेदी

* नोव्हेंबरमध्ये ६ हजार ६९७.२० क्विंटल, डिसेंबर ४० हजार ९२६.९५ क्विंटल, जानेवारी ४९ हजार ४०३.७५ क्विंटल, फेब्रुवारी ३ हजार २९९.४० क्विंटल.

* एकूण १ लाख ३२८ क्विंटल कापूस खरेदी शासकीय हमीभावात या केंद्रावर करण्यात आली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Rajma farming: कमी दिवसात येणारा राजमा जास्त फायद्याचा

Web Title: Cotton Market: latest news Cotton procurement at 'this' center finally closed; Read the reason in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.