यवतमाळ : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे खरबदारी म्हणून सीसीआयनेCCI रविवारपर्यंत कापूस खरेदी बंद ठेवण्याच्या सूचना जिल्ह्यातील १४ ही केंद्रांना दिल्या आहेत.
सोमवार(३० डिसेंबर) पासूनच कापूसCotton खरेदी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही बाब लक्षात घेऊनच कापूस विक्रीसाठी आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सीसीआय जिल्ह्यातील १४ केंद्रांवर कापूस खरेदी करीत आहे. या ठिकाणी खरेदी झालेला कापूस पुरेसे शेड नसल्याने उघड्यावरच आहे, अशा ठिकाणी कापूस ओला होण्याचा मोठा धोका आहे. याशिवाय कापूस विक्रीसाठी शेतकरी आले तर त्यांचीही मोठ्या प्रमाणात तारांबळ उडते.
यामुळे सीसीआयने २९ तारखेपर्यंत कापूस खरेदी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सीसीआयच्या केंद्रांवर कापूस घेताना ओलावा मोजला जातो. आठ टक्के ओलावा असेल तर असा कापूस खरेदी केला जातो.
मात्र, वातावरणात आर्द्रता असेल तर कापसावर त्याचा परिणाम होतो. असा कापूस घेतला गेला तर त्याचा खरेदी झालेल्या कापसावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे कापसाची गंजी खराब होऊ शकते. यातूनच सीसीआयने वातावरणात बदल होईपर्यंत खरेदी थांबविली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यवतमाळ विभाग राहिला आघाडीवर
कापूस खरेदी करताना दरवर्षी वणी विभाग आघाडीवर असतो. यावर्षी कापूस खरेदीचे चित्र त्याच्या विपरित आहे. वणी विभागाच्या तुलनेत यवतमाळ विभागात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. आतापर्यंत सीसीआयने कापसाची खरेदी ५,५०,००० क्विंटल करण्यात आली आहे. तर खासगी व्यापाऱ्यांनी ४,००,००० क्विंटल खरेदी केली आहे. विभागातील केंद्रांवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापूस विक्रीसाठी सीसीआयकडे आणला आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक आहे.
हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : 'सीसीआय'ने यवतमाळ जिल्ह्यात 'इतक्या' कोटींचा कापूस केला खरेदी वाचा सविस्तर