Lokmat Agro >बाजारहाट > Cotton market :'सीसीआय' केंद्रांवर कापूस विक्रीचा ओघ वाढला; असा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Cotton market :'सीसीआय' केंद्रांवर कापूस विक्रीचा ओघ वाढला; असा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Cotton market: Cotton sales increased at 'CCI' centers read in deatils | Cotton market :'सीसीआय' केंद्रांवर कापूस विक्रीचा ओघ वाढला; असा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Cotton market :'सीसीआय' केंद्रांवर कापूस विक्रीचा ओघ वाढला; असा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Cotton Market : अर्थिक अडचणीतील शेतकरी (Farmer) ७ हजार ५२१ रुपये क्विंटल या हमीभावाने 'सीसीआय'कडे(CCI) विक्री करीत आहेत. त्यामुळे या केंद्रावर वाहनांच्या रांगा वाढताना दिसत आहेत.

Cotton Market : अर्थिक अडचणीतील शेतकरी (Farmer) ७ हजार ५२१ रुपये क्विंटल या हमीभावाने 'सीसीआय'कडे(CCI) विक्री करीत आहेत. त्यामुळे या केंद्रावर वाहनांच्या रांगा वाढताना दिसत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

अमरावती : दिवाळी पश्चात कापसाचे दरात वाढ झालेली नसल्याने अर्थिक अडचणीतील शेतकरी (Farmer) ७ हजार ५२१ रुपये क्विंटल या हमीभावाने 'सीसीआय'कडे(CCI) विक्री करीत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापसाची साठवणूक केलेली आहे.

यंदा कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे पांढरे सोने मातीमोल झाले आहे. कॉटनबेल्ट(Cotton Belt) म्हणून ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यात कापसाची दैना झालेली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाने कपाशीचे मोठे नुकसान झालेले आहे.

यंदा कापसात बोंडअळी, बोंडसड व लाल्याने दोन ते तीन वेच्यात उलंगवाडी होत आहे. त्यात खुल्या बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ३०० व सीसीआयमध्ये ७ हजार ५२१ रुपये क्विंटल दरम्यान भाव मिळत आहे. कापूस वेचणीचे दर १० किलोच्या वर पोहोचले आहेत.

हंगामात पेरणी ते वेचणीदरम्यान वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत यंदा कापसाला मिळणारा भाव कमी आहे. त्यातच गावखेड्यात खेडा खरेदीत लूट होत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्रच कोलमडले आहे.
यंदा कापसाला हमीभावही मिळत नसल्याने खुल्या बाजारात आवक थांबल्याचा थेट फटका ६० पेक्षा अधिक जिनिंग प्रेसिंगच्या युनिटला बसला आहे.

या सर्व युनिटमध्ये क्षमतेच्या २५ टक्केच काम होत असल्याची व्यावसायिकांची माहिती आहे. त्यामुळे या व्यवसायावर निर्भय असलेल्या ५ ते ६ हजार मजुरांचा रोजगार हिरावल्या गेला असल्याचे चित्र आहे.

केंद्रांमध्ये रोज ८ ते १० हजार क्विंटलची खरेदी

जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, येवदा, चांदूरबाजार, भातकुली, नांदगाव पेठ, धामणगाव रेल्वे व वरुड अशी ८ सीसीआय केंद्र सुरु आहेत. तर मोर्शी येथील केंद्र सध्या निविदा प्रक्रियेत आहे. ही आठही केंद्र नोव्हेंबर २०२४ या महिन्यात वेगवेगळ्या तारखांना सुरू झालेली आहे. या केंद्रांवर रोज ८ ते १० हजार क्विंटल कापसाची खरेदी होत असल्याची प्रशासनाची माहिती आहे.

खुल्या बाजारात कापसाचे दर (रु/क्विं)

१६ डिसेंबर                       ७१५० ते ७५५०
१८ डिसेंबर                        ७१५० ते ७५००
२० डिसेंबर                        ७०५० ते ७३००
२३ डिसेंबर                        ७१०० ते ७४५०
३० ऑक्टोबर                      ७१२५ ते ७४००
०१ जानेवारी                        ७१५० ते ७४५०


हे ही वाचा सविस्तर : Cotton procurement : 'सीसीआय'च्या केंद्रातील कापूस खरेदी पुन्हा सुरळीत !

Web Title: Cotton market: Cotton sales increased at 'CCI' centers read in deatils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.