Lokmat Agro >बाजारहाट > Chilli Market : बाजारात उतरला हिरव्या मिरचीचा ठसका; काय आहे कारण वाचा सविस्तर

Chilli Market : बाजारात उतरला हिरव्या मिरचीचा ठसका; काय आहे कारण वाचा सविस्तर

Chilli Market: Green chillies have hit the market; Read the reason in detail | Chilli Market : बाजारात उतरला हिरव्या मिरचीचा ठसका; काय आहे कारण वाचा सविस्तर

Chilli Market : बाजारात उतरला हिरव्या मिरचीचा ठसका; काय आहे कारण वाचा सविस्तर

Chilli Market : शेतकऱ्यांची आशेने हिरवी मिरची लागवड केली पण सततच्या पावसामुळे रोगांनी कहर केल्याने जाफराबाद तालुक्यातील सुमारे १ हजार ५०० हेक्टरवरील मिरची पिकाला जबर फटका बसत आहे. खर्च वाढला, उत्पन्न अर्ध्यावर, आणि भाव मात्र ३ ते ३५०० रुपयांदरम्यानच आहेत. (Chilli Market)

Chilli Market : शेतकऱ्यांची आशेने हिरवी मिरची लागवड केली पण सततच्या पावसामुळे रोगांनी कहर केल्याने जाफराबाद तालुक्यातील सुमारे १ हजार ५०० हेक्टरवरील मिरची पिकाला जबर फटका बसत आहे. खर्च वाढला, उत्पन्न अर्ध्यावर, आणि भाव मात्र ३ ते ३५०० रुपयांदरम्यानच आहेत. (Chilli Market)

शेअर :

Join us
Join usNext

Chilli Market : शेतकऱ्यांची आशेने हिरवी मिरची लागवड केली पण सततच्या पावसामुळे रोगांनी कहर केल्याने जाफराबाद तालुक्यातील सुमारे १ हजार ५०० हेक्टरवरील मिरची पिकाला जबर फटका बसत आहे. खर्च वाढला, उत्पन्न अर्ध्यावर, आणि भाव मात्र ३ ते ३५०० रुपयांदरम्यानच आहेत.(Chilli Market)

जाफराबाद तालुक्यामधील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सततच्या पावसाने व मिरची पिकावर आलेल्या अज्ञात रोगामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.(Chilli Market)

यावर्षी मिरची तोडणी आणि औषध फवारणी खर्च पाहता योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. रिमझिम पावसाने मिरचीच्या झाडांची पाने पिवळी पडून कोकडा पडून नुकसान होत आहे. मिरची पिवळी पडून खराब होत आहे. (Chilli Market)

तालुक्यातील जवळपास १ हजार ५०० हेक्टरपेक्षा जास्त मिरचीची लागवड करण्यात आलेली आहे. सुरुवातीला मिरची लागवड चांगल्याप्रकारे उगवण होऊन उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र, उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे.(Chilli Market)

भाव मात्र, ३ ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत मिळत आहेत. येथील मिरचीला बाहेर राज्यात मोठी मागणी आहे. अशा परिस्थितीमध्ये मिरचीला भाव नसल्यामुळे शेतकरी सापडला आहे.(Chilli Market)

रिमझिम पावसाचाही फटका

रिमझिम पावसाने व अज्ञात रोगामुळे मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात कपाशी, सोयाबीन ही दोन पिके प्रामुख्याने घेतली जातात. शेतकरी आता मिरची, अद्रक, सोयाबीन, अशा पिकांकडे लागवडीसाठी वळत आहे. उत्पादन वाढीसाठी ठिबक, मल्चिंग पेपर, महागड्या औषधी असा खर्चही यावर्षी शेतकऱ्यांनी केला.

१५०० हेक्टरपेक्षाही अधिक क्षेत्रांवर मिरचीची लागवड

जवळपास १ हजार ५०० हेक्टरपेक्षा जास्त मिरचीची लागवड करण्यात आलेली आहे. सुरुवातीला मिरची लागवड चांगल्याप्रकारे उगवण होऊन उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती.

तेजी, मंदीचा फटका

* बाजारपेठेत ज्या दिवशी मिरचीची आवक वाढते त्या दिवशी शेतकऱ्याच्या मिरचीला कमी भाव दिल्या जात आहे. यामुळे एकाच दिवसात दोन दर असतात.

* काही ठरावीक शेतकऱ्यांना भाव वाढवून देऊन व्यापारी पोबारा करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. व्यापारी आपल्या सोयीनुसार भाव देत आहेत.

* दुपारी ३ वाजेदरम्यान मिरचीची आवक सुरू होते. सायंकाळपर्यंत आवक सुरू असते. मात्र, सगळीकडेच संगनमताने भाव दिल्या जातो. ज्या दिवशी आवक कमी त्या दिवशी भाव अधिक दिल्या जातो, आवक वाढली की, कमी मिळतो.

ढगाळ वातावरण असल्याने विविध रोगांचा प्रादुर्भाव

शेतकरी रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु, त्यांचे प्रयत्न अपयशी होत असल्याचे दिसत आहे. रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरण असल्यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे खर्च वाढतच चालला आहे. खर्चही पदरी पडतो की नाही? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

शेतकऱ्यांनी लागवडीवर केलेला खर्चदेखील काढणे अवघड झाले आहे. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने यावर्षी मिरची पिकावर फवारणीचा खर्च वाढला आहे. १० रुपये किलो तोडणीचा खर्च येतो. तसेच गाडी भाडे, बारदाना खर्च लावल्यास शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित रक्कम पडत नाही. - माणिक पंडित, शेतकरी, जानेफळ पंडित.

हे ही वाचा सविस्तर : Chilli Market : रोज ५ कोटींची उलाढाल; हिरव्या मिरचीच्या बाजारात पिंपळगाव रेणुकाईचा ठसका

Web Title: Chilli Market: Green chillies have hit the market; Read the reason in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.