Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी मुगाच्या दरात मोठी उसळी; राज्याच्या 'या' बाजार समितीत मिळतोय उच्चांकी दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 09:30 IST

यंदाच्या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी मुगाची लागवड केली होती. हा मूग आता बाजारात दाखल होत असून, या शेतमालास चांगला भाव मिळत आहे.

यंदाच्या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी मुगाची लागवड केली होती. हा मूग आता बाजारात दाखल होत असून, या शेतमालास चांगला भाव मिळत आहे.

वाशिम बाजार समितीत शनिवारी या शेतमालास ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा कमाल दर मिळाला. त्यामुळे उन्हाळी मुगाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसून आले.

वाशिम जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळी हंगामात जवळपास ८७१२ हेक्टरवर उन्हाळी पेरणीचे नियोजन होते. प्रत्यक्षात ६२८८.८८ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली.

त्यात उन्हाळी मुगाच्या पेरणीचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. मधल्या काळातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीने या पिकांना मोठा फटका बसला. तथापि, काही ठिकाणी या पिकांचे उत्पादन चांगले होत असल्याचे दिसत आहे.

त्यात मुगाला चांगलाच दर मिळाल्याचे शनिवारी दिसून आले. वाशिम बाजार समितीत या दिवशी २० क्विंटल उन्हाळी मुगाची आवक झाली. या शेतमालास किमान ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल ते कमाल ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळाल्याचे दिसले.

जिल्ह्यात २३२४.१० हेक्टरवर उन्हाळी मूग

यंदाच्या उन्हाळी हंगामात २७५८.२१ हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी अपेक्षित होती. प्रत्यक्षात २३२४.१० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी मुगाची पेरणी आहे. हे प्रमाण अपेक्षित सरासरी क्षेत्राच्या ८४.२६ टक्के आहे.

मुगाची पेरणी

अपेक्षित पेरणी २७५८.२१

प्रत्यक्षात पेरणी २३२४.१०

आवक मात्र जेमतेम !

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळी मुग दाखल होत असून, या शेतमालाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दरात तेजी येत आहे. मात्र, जिल्ह्यात उन्हाळी मुगाची पेरणी खूप कमी आहे.

वाशिम बाजार समितीत या शेतमालास ७ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल, तर कारंजात ७हजार ३४५ रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला, दरात आणि मागणीत आणि दरात वाढ होत असली तरी या शेतमालाचीह आवक मात्र खूप कमी आहे.

हेही वाचा : उन्हात काम करत असाल तर काळजी घ्या; हृदय अन् किडनीवर येतोय ताण

English
हिंदी सारांश
Web Title : Summer Moong Prices Surge; Record Rates in Washim Market

Web Summary : Summer moong farmers in Washim district are seeing high prices, reaching ₹7,500 per quintal. Despite some crop damage from unseasonal rain, the market demand is strong, though overall supply remains limited.
टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डपीकशेतकरीमार्केट यार्ड