Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bedana Market Sangli : बेदाणा सौद्याच्या सुरवातीलाच सांगली मार्केट यार्डात १८० टन बेदाण्याची आवक दरात झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 09:34 IST

Bedana Market Sangli दिवाळीच्या सुट्टीनंतर महिन्याने बेदाणा सौद्यास प्रारंभ झाला. शुक्रवारी झालेल्या बेदाणा सौद्यात १८० टन बेदाण्याची आवक झाली असून प्रतिकिलो २० ते २५ रुपयांनी दरात वाढ झाली आहे.

सांगली: दिवाळीच्या सुट्टीनंतर महिन्याने बेदाणा सौद्यास प्रारंभ झाला. शुक्रवारी झालेल्या बेदाणा सौद्यात १८० टन बेदाण्याची आवक झाली असून प्रतिकिलो २० ते २५ रुपयांनी दरात वाढ झाली आहे. हिरव्या गोल आणि लांब बेदाण्यास १६० ते १९५ रुपयांचा दर मिळाला आहे.

शून्य पेमेंटसाठी व दिवाळी सुट्टीमध्ये सांगली, तासगाव बेदाणा असोसिएशनने सांगली व तासगावातील बेदाणे सौदे बंद ठेवले होते. दिवाळीनंतर बुधवारी व शुक्रवारी सांगली मार्केट यार्डात बेदाणा सौद्यांमध्ये चांगलीच आवक झाली.

बेदाण्याची मागणी असल्याने मोठ्या प्रमाणावर खरेदीदार आले होते. त्यावेळी चांगल्या हिरव्या गोल व लांब बेदाण्यास १६० ते १९५ रुपये प्रतिकिलो तर मध्यम दर्जाच्या बेदाण्यास १२० ते १५० रुपये तर काळा बेदाणा ६० ते १०० रुपये दर मिळाला आहे.

पिवळा बेदाण्यास १२० ते १८० रुपये दर मिळाला. दिवाळीपूर्वी बेदाण्यास मिळणाऱ्या दरात सध्या १५ ते २० रुपये दर वाढला आहे. सध्या पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागा संकटात आहेत.

आगाप छाटणी असल्यामुळे अनेक बागा फ्लॉरिंग व पोग्या स्टेजमध्ये आहेत. अनेक बागा खराब झाल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या होळी सणासाठी फेब्रुवारीमध्ये बेदाण्याची आवक कमी होण्याची शक्यता असल्यामुळे व्यापारी सध्या बेदाणी खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

बुधवारी १९ दुकानात ३२ गाडी तर शुक्रवारी १५ दुकानात १८ गाडी बेदाणाची आवक झाली होती. सौद्यामध्ये मनोज मालू, शेखर ठक्कर, पणु सारडा, अस्की सावकार, सुनील हडदरे, अमित पटेल, आदीसह व्यापारी उपस्थित होते.

शून्य पेमेंटची चांगली संकल्पनासांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे व सचिव महेश चव्हाण म्हणाले, सांगली बाजार समिती ही एक विश्वासू बाजारपेठ म्हणून देशात नावलौकिक आहे. जवळपास सर्वच व्यापाऱ्यांनी शून्य पेमेंट हा उपक्रम यशस्वी पूर्ण केला आहे. शेतकऱ्यांनी आपला बेदाणा सांगली बाजार समिती विक्रीसाठी आणावा असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :द्राक्षेबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसांगलीशेतकरीदिवाळी 2024