Join us

Bedana Bajar Bhav : बाजारात बेदाणा दरात तेजी; वाचा काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 16:26 IST

मार्केट यार्डात शुक्रवारी निघालेल्या नवीन बेदाणा सौद्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ३० टन बेदाण्याची आवक झाली होती. यावेळी हिरव्या बेदाण्यास प्रतिकिलो २२५ तर पिवळ्या बेदाण्यास १९१ रुपये दर मिळाला.

सांगली मार्केट यार्डात शुक्रवारी निघालेल्या नवीन बेदाणा सौद्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ३० टन बेदाण्याची आवक झाली होती. यावेळी हिरव्या बेदाण्यास प्रतिकिलो २२५ तर पिवळ्या बेदाण्यास १९१ रुपये दर मिळाला.

बेदाण्याचे उत्पादन कमी असल्यामुळे दर तेजीत राहण्याचा पान्याचा अंदाज आहे. शुक्रवारी झालेल्या नवीन बेदाणा सौदा शुभारंभप्रसंगी सात दुकानात ३० नवीन बेदाण्याची आवक झाली. खंडेराजुरीचे शेतकरी प्रमोद चौगुले यांच्या हिरव्या बेदाण्यास प्रतिकिलो २२५ रुपये दर मिळाला.

बेदाण्याचे प्रतिकिलो दर

हिरवा बेदाणा - १८० ते २२५ रुपयेमध्यम बेदाणा - १३० ते १७० रुपयेकाळा बेदाना - ६० ते १०० रुपयेपिवळ्या बेदाणा - १८० ते १९१ रुपये

यंदा द्राक्षाचे उत्पादनही कमी आहे. यामुळे बेदाण्याचेही दर तेजीतच असणार आहेत. शेतकऱ्यांनी सांगलीबाजार समितीत बेदाणा विक्रीस आणावा. - सुजय शिंदे, सभापती, सांगली बाजार समिती.

हेही वाचा : Farmer Success Story : आधुनिक शेती तंत्रज्ञानाने साधली प्रगती; गोपालरावांची ८ एकरात ४८ लाखांची कमाई

टॅग्स :द्राक्षेबाजारशेतकरीशेतीसांगलीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्ड