Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > विंचूर, लासलगावच्या कांद्याला सरासरी भाव २ हजारांचा

विंचूर, लासलगावच्या कांद्याला सरासरी भाव २ हजारांचा

Average price of onion of Vinchur, Lasalgaon is 2 thousand | विंचूर, लासलगावच्या कांद्याला सरासरी भाव २ हजारांचा

विंचूर, लासलगावच्या कांद्याला सरासरी भाव २ हजारांचा

आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, विंचूर उपबाजार समित्यांमध्ये साधारण 16 ते 21 हजार क्विंटल कांद्याची आवक ...

आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, विंचूर उपबाजार समित्यांमध्ये साधारण 16 ते 21 हजार क्विंटल कांद्याची आवक ...

आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, विंचूर उपबाजार समित्यांमध्ये साधारण 16 ते 21 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली असून शेतकऱ्यांना सुमारे दोन हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. 

विंचूर उपबाजार समितीत आज दिवसभरात १२११ नग कांदा व एकूण 21 हजार 800 क्विंटल कांद्याची आवक झाली. उन्हाळी कांद्याला किमान 550 ते 2230 रुपये भाव मिळाला तर गोल्टा खाद कांद्याला पंधराशे ते 2300 रुपयांचा भाव मिळाला. लासलगाव उपबाजार समितीत आज 16810 क्विंटल कांदा आवक झाली . उन्हाळी कांद्याला 700 ते 2300 रुपयांचा दर मिळाला . 

निफाड, पिंपळगाव आणि सायखेडा या उपबाजार समित्यांमध्ये सहाशे ते चौदाशे नग कांद्याची आवक झाली असून कांद्याचा सरासरी दर दोन हजार रुपये इतका होता. विंचूर उपबाजार समितीमध्ये 56 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सोयाबीनला सरासरी ४ हजार ८५० रुपये भाव मिळाला.

Web Title: Average price of onion of Vinchur, Lasalgaon is 2 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.