Join us

Lemon Market ऊन वाढताच लिंबाचा वाढला तोरा; वाचा काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 10:15 AM

लिंबू बाजारभाव

हिंगोली जिल्ह्यातील तापमानात वाढ होताच लिंबूपाणीची मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात लिंबाचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी बाजारात लिंबाच्या दरात वाढ झाली आहे. एरवी दहा रुपयांना पाच ते दहा मिळणारे लिंबू आता दहा रुपयांना दोन ते तीन मिळत असल्याचे दिसून येत आहे.

हिंगोली जिल्ह्याचे तापमान ४१ अंशावर पोहोचले आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर जाणे अनेकजण टाळत आहेत. कामानिमित्त बाहेर जाणाऱ्यांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.

त्यामुळे उन्हाची दाहकता कमी करण्याच्या अनुषंगाने अनेकजण लिंबूपाणी पिण्यास प्राधान्य देत आहेत. उसाच्य रसातही लिंबाचा वापर केला जातो काहीजण जेवताना लिंबाचा वापन करतात. त्यामुळे सध्या लिंबाच मागणी वाढल्याचे दिसून येत आहे.

मागणीच्या तुलनेत आवक कमी

जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी लिंबाच्या बागा घेतल्या आहेत. तर शेजारील जिल्ह्यातूनही आवक होते. उन्हाळ्यात लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र हिंगोलीच्या भाजीमंडईत मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

रसदार लिंबू क्वचित पाहावयास मिळत आहेत. आकाराने लहान व हिरव्या लिंबाचे प्रमाण जास्त आहे. चांगल्या दर्जाचे व रसदार लिंबू १० रुपयांना दोन ते तीनच मिळत आहेत. आकाराने लहान असलेले लिंबू दहा रुपयांना पाच मिळत आहेत.

राज्यातील बाजारपेठेत बुधवारी (दि.२२) लिंबूची झालेली आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/05/2024
अकलुज---क्विंटल6550132
कोल्हापूर---क्विंटल80400075006000
जळगाव---क्विंटल17200040003000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल22250050003750
राहता---क्विंटल1700070007000
नाशिकहायब्रीडक्विंटल18450080007500
धाराशिवकागदीक्विंटल84000100007000
सोलापूरलोकलक्विंटल19100075004500
नागपूरलोकलक्विंटल50400060005500
मुंबईलोकलक्विंटल482350045004000
भुसावळलोकलक्विंटल61500060005500
हिंगणालोकलक्विंटल1500050005000
टॅग्स :बाजारमार्केट यार्डमार्केट यार्डशेतीशेतकरीफळेउष्माघातहिंगोली