Join us

राज्यात या ४ कृषि उत्पन्न बाजार समित्यांत शेतकरी भवन बांधण्यास मान्यता; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:55 IST

"राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन" या योजनेंतर्गत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय व्हावी तसेच शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधा देखील त्याच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात.

"राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन" या योजनेंतर्गत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय व्हावी तसेच शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधा देखील त्याच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात.

या दृष्टीने ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी भवन उपलब्ध नाही तेथे नवीन शेतकरी भवन बांधणे तसेच, ज्या बाजार समितीच्या परिसरात शेतकरी भवन अस्तित्वात आहे तथापि, सुस्थितीत नाही अशा ठिकाणी शेतकरी भवनाची दुरुस्ती करणे. यासाठी शासन अनुदान उपलब्ध करुन देते.

सदर योजनेंतर्गत राज्यातील चार कृषि उत्पन्न बाजार समितींना नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

यात कृषि उत्पन्न बाजार समिती, बिलोली, जि. नांदेड, कृषि उत्पन्न बाजार समिती, वडगाव, जि. कोल्हापूर, कृषि उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजारपेठ वडीगोद्री, ता. अंबड जि. जालना व कृषि उत्पन्न बाजार समिती, सिरोंचा जि. गडचिरोली या चार बाजार समित्यांचा समावेश आहे.

बाजार समिती आणि निधी१) कृषि उत्पन्न बाजार समिती, बिलोली, जि. नांदेड - रु.१,५२,९१,९७०/- (अक्षरी रुपये एक कोटी बावन्न लक्ष एक्याण्णव हजार नवशे सत्तर फक्त)२) कृषि उत्पन्न बाजार समिती, वडगाव, जि. कोल्हापूर - रु.१,५०,२२,९५१/- (अक्षरी रुपये एक कोटी पन्नास लक्ष बावीस हजार नऊशे एकावन्न फक्त)३) कृषि उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजारपेठ वडीगोद्री, ता. अंबड जि. जालना - रु.१,५२,७१,२४७/- (अक्षरी रुपये एक कोटी बावन्न लक्ष एकाहत्तर हजार दोनशे सत्तेचाळीस फक्त)४) कृषि उत्पन्न बाजार समिती, सिरोंचा जि. गडचिरोली - रु.२,३६,६९,४४०/- (अक्षरी रुपये दोन कोटी छत्तीस लक्ष एकोणसत्तर हजार चारशे चाळीस फक्त) एवढ्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

अधिक वाचा: Ration Card KYC : ३० एप्रिलपूर्वी हे करा नाहीतर तुमचे रेशनकार्ड होऊ शकते बंद

टॅग्स :पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारमार्केट यार्डशेतकरीगडचिरोलीकोल्हापूरनांदेडजालना