खामगाव : 'मार्च एन्ड'चे कारण समोर ठेवून खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (Khamgaon Agricultural Produce Market Committee) बुधवारपासून बंद आहे. आणखी एक दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याने खासगी बाजारात कमी भावाने शेतमाल (agricultural produce) विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
मार्च महिन्यात शेतकऱ्यांना पीककर्जाचा भरणा, लग्नसराई व इतर आवश्यक खर्चासाठी पैशांची गरज असते. मात्र, याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 'मार्च एन्डिंग' आणि नाणेटंचाईचे कारण पुढे करून कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार बंद ठेवले जातात. (APMC)
यंदाही बुधवार, २६ मार्चपासून बाजार समितीचे व्यवहार बंद आहेत. दोन एप्रिलला त्या पूर्ववत सुरू होतील, असा अंदाज आहे. बाजार समिती बंद असल्याने खासगी व्यापाऱ्यांकडून शेतमालाची(agricultural produce) खरेदी कमी दराने केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.(APMC)
व्यापाऱ्यांनी नाणेटंचाईचे कारण पुढे करत कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवले. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या दराने खासगी व्यापाऱ्यांना शेतमाल विकावा लागत आहे.
सध्याचे शेतमालाचे सरासरी दर (प्रति क्विंटल)
शेतमाल | दर (प्रति क्विंटल) |
तूर | ५,००० |
हरभरा | ३,८०० |
सोयाबीन | ३,८०० |
सोयाबीनला मिळतोय ३,८०० रुपये भाव
बाजार समिती बंद असल्याने सध्या खासगी व्यापाऱ्यांकडून सरासरी ३,२०० ते ३,८०० रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीनची खरेदी केली जात आहे. बाजार समितीमध्ये हा दर सरासरी ४,१०० रुपये मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.