Join us
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची माळ यंदाही खाणार भाव; वाचा प्रति माळेला काय मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 16:37 IST

pandhara kanda market औषधी गुणधर्म असणारा अलिबागचा पांढरा कांदा पेणच्या बाजारात दाखल झाला आहे. या कांद्याला स्थानिकांसह पर्यटकांचीही पसंती मिळत आहे.

पेण: औषधी गुणधर्म असणारा अलिबागचा पांढरा कांदा पेणच्या बाजारात दाखल झाला आहे. या कांद्याला स्थानिकांसह पर्यटकांचीही पसंती मिळत आहे.

पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन मिळाल्यानंतर झालेली प्रसिद्धी आणि कृषी विभागाने आखलेल्या विविध प्रोत्साहन योजनांमुळे पांढऱ्या कांद्याच्या बाजारपेठेला पेण तालुक्यात दोन महिने पोषक वातावरण निर्माण होणार आहे.

महिनाभर ग्रामदेवतांच्या जत्रांमध्ये पांढरा कांद्याची माळ ही ग्रामस्थ हमखास खरेदी करत असल्याने अलिबागचा पांढरा कांदा यंदाही भाव खाणार आहे.

परिसरात प्रमुख रस्त्यांवर पांढऱ्या कांद्याची दुकाने लागली आहे. तेथे लागलेल्या माळ्या लक्ष वेधत आहेत. आठवडा बाजार, चैत्र, वैशाख महिन्यातील येऊ घातलेल्या यात्रांमध्ये दरवर्षी पांढऱ्या कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते.

सर्व अनुकूल बाबींचा विचार करता घरोघरी पांढरा कांद्याची माळ नेली जाते. यामुळे या दोन महिन्यांत पेणमध्ये बाजारात झालेली पांढऱ्या कांद्याची आवक आणि रस्त्यावरच्या दुकानातून पांढऱ्या कांद्याच्या टांगलेल्या माळा सध्या लक्ष वेधून घेत आहेत.

२५० हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड◼️ अलिबागचा पांढरा कांदा हा चव, टिकाऊपणा आणि दर्जा या विशिष्ट गुणधर्मामुळे राज्यभरात प्रसिद्ध आहे.◼️ यंदा २५० हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली असून पाऊस लांबल्याने पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले.◼️ त्यामुळे कांदा पीक जोमदार, चांगले आले आहे. यामुळेच उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा शेतकरी बांधव व्यक्त करीत आहेत.◼️ कांद्याची मोठी माळ २५० ते ३०० रुपयांपर्यंत तर लहान माळ २०० रुपयांपर्यंत विकली जात आहे.◼️ औषधी गुणधर्मामुळे ग्राहकांना हा कांदा मोठ्या प्रमाणात भावतो आणि तो खरेदीही केला जातो.

अधिक वाचा: ग्रामीण भागातील सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार आता मालकी हक्क; वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Alibaug's white onion garland to fetch high price this year.

Web Summary : Alibaug's medicinal white onion arrives in Pen market, attracting locals and tourists. Increased cultivation on 250 hectares promises a good yield due to ample water. Onion garlands sell for ₹200-₹300, driven by their unique taste and medicinal properties.
टॅग्स :कांदाशेतकरीशेतीअलिबागबाजारमार्केट यार्ड