Lokmat Agro >बाजारहाट > Tendu Patta : तेंदूपानांचा खरेदी दर ठरला, मजुरांचा कधी? तेंदूपानांमागे दडलंय अर्थकारण

Tendu Patta : तेंदूपानांचा खरेदी दर ठरला, मजुरांचा कधी? तेंदूपानांमागे दडलंय अर्थकारण

Agriculture News: The purchase price of tendupana has been decided, when will it be for laborers? The economics behind tendupana | Tendu Patta : तेंदूपानांचा खरेदी दर ठरला, मजुरांचा कधी? तेंदूपानांमागे दडलंय अर्थकारण

Tendu Patta : तेंदूपानांचा खरेदी दर ठरला, मजुरांचा कधी? तेंदूपानांमागे दडलंय अर्थकारण

Tendupatta : आता कंत्राटदार देतील तेवढी मजुरी गोड मानून घ्यायची अन् पुढच्या हंगामाची वाट पाहायची, अशी मजुरांची स्थिती आहे.

Tendupatta : आता कंत्राटदार देतील तेवढी मजुरी गोड मानून घ्यायची अन् पुढच्या हंगामाची वाट पाहायची, अशी मजुरांची स्थिती आहे.

शेअर :

Join us
Join usNext

- मंगल जीवने 

गडचिरोली : सरत्या आठवड्यात शासनाने तेंदूपानांच्या (Tendupane Standard Bag Price) स्टैंडर्ड बॅगचे दर निश्चित केले. त्यात गडचिरोलीला सर्वाधिक दर मिळाला, पण मजुरीच्या दराबाबत ठोस धोरणच नाही. आता कंत्राटदार देतील तेवढी मजुरी गोड मानून घ्यायची अन् पुढच्या हंगामाची वाट पाहायची, अशी मजुरांची स्थिती आहे. मजुरांच्या जिवावर गब्बर होऊ पाहणाऱ्यांना अप्रत्यक्ष पाठबळ देण्याच्या धोरणात बदल होत नाहीत, तोपर्यंत राबणाऱ्या हातांचे शोषण दूर होणार नाही. तेंदूपाने (Tendupane) संकलित करणाऱ्या आदिवासी बांधवांना ना कुठले विमा कवच आहे, ना सुरक्षेची हमी आहे. नक्षल्यांची दहशत, वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा धोका अशी जिवाची जोखीम पत्करून तेंदूपाने तोडून जगण्याची लढाई लढणाऱ्या या उदास, भकास चेहऱ्यांच्या श्रमाचे मोल होणार कधी, हा प्रश्नच. 

तेंदूपाने अन् आदिवासी है वर्षांनुवर्षांचे अतूट नात. जंगलाच्या सानिध्यात राहणारे आदिवासी तेंदूपानांच्या संकलनातून चार पैसे गाठीला बांधतात अन् त्यावरच ते वर्षभर गुजराण करतात, भामरागड, सिरोंचा, आलापल्ली, गडचिरोली (Gadchiroli District) व वहसा आदी पाचही वन विभागांत दरवर्षी उन्हाळ्यात विशेषतः एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तेंदूपाने संकलनाला सुरुवात होते. 

२०२७ या वर्षासाठी वनक्षेत्रातून प्रतिगोणी ४ हजार २५० तर खासगी क्षेत्रातून तेंदूपाने खरेदीसाठी ४ हजार ३०० रुपये दर शासनाने जाहीर केलेला आहे. प्रतिगोणी दरवृद्धीची अनुक्रमे टक्केवारी ८९७ व ८.८६ एवढी आहे. संपूर्ण राज्यात सर्वाधिक दर मिळाला तो गडचिरोलीतील तेंदूला. यामुळे जिल्ह्यातील मजुरांच्या प्रतिशेकडा मजुरीत वाढ होण्याची भाबड़ी आशा आहे, पण खरी गोम पुढे आहे. शासन असे तेंदूपानांच्या प्रतिगोणीचे स्टैंडर्ड दर निश्चित करते, तसे तेंदूपाने संकलित करणाऱ्या मजुरांचे दर निश्चित नाहीत. 

वनविभाग व ग्रामसभा तेंदूपानांसाठी निविदा प्रक्रिया राबवितात, नेमलेला कंत्राटदार ठरवेल ती दर घेऊन मजुरांना गपगुमान तेंदूपाने संकलित करावे लागतात. काही कंत्राटदार परराज्यातील असतात. काहीवेळा कंत्राटदार नक्षल्यांच्या दहशतीमुळे, खंडणी वसुलीमुळे काम अर्ध्यावर सोडून पळून जातात, अशावेळी मजूरांची मजुरी तर बुडते, पण बोनसलाही मुकावे लागते. याची दाद ना फिर्याद असते. यातून मजुरांच्या श्रमाचे शोषण होते. तेंदूपाने संकलन ते खरेदी या प्रक्रियेत गोरगरीब मजुरांना केंद्रस्थानी ठेवून त्रुटी दूर केल्या तरच हे शोषण थांबेल, असे चित्र आहे.

हा तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार 
तेंदूपाने तोडणाऱ्या मजुरांना ७० पानांच्या शंभर पुड्यांमागे ८०० ते ९०० रुपये मजुरी मिळते. दक्षिणेकडील राज्यांत या पानांपासून विड्या बनविल्या जातात. विहधा बनविणाऱ्या कामगारांना तेंदूपाने तोडणान्या मजुरांपेक्षा अधिक मजुरी मिळते, शिवाय विमा, आरोग्यसुविधा व इतर लाभही भेटतात. तेंदूपाने संकलनाच्या हंगामातून मिळणारी तुटपुंजी मजुरी हा मजुरांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार असल्याचा आरोप नेहमीच होतो.

३५ टक्के वाटा एकट्या गडचिरोलीचा 
राज्यात तेंदूपानांचे जेवढे संकलन होते, त्यातील ३५ टक्के तेंदूपाने संकलन हे एकट्या गडचिरोलीत होते. घनदाट जंगल, भरमसाठ व दर्जेदार वनसंपदा यामुळे येथे मुबलक प्रमाणात तेंदूपाने मिळतात. आदिवासींसाठी हा हंगामी रोजगार असतो. मात्र, एवढ्या वर्षात सर्वाधिक तेंदूपाने पुरविणाऱ्या गडचिरोलीतील मजुरांबाबत ठोस धोरण निश्चित झाले नाही की तेंदूपानांसह वनोपजावर आधारित प्रक्रिया उद्योगही उभारू शकले नाहीत.

Tendu Patta : यंदाचा तेंदू पाने खरेदी दर ठरला; जाणून घ्या काय असणार दर

Web Title: Agriculture News: The purchase price of tendupana has been decided, when will it be for laborers? The economics behind tendupana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.