हळदी पाठोपाठ नाविन्यपूर्ण पीक म्हणून ओळख मिळवत असलेल्या चियाच्या दरातही घसरण सुरू झाली आहे. आठवडाभरात चियाच्या दरातक्विंटलमागे १ हजार रुपयांची घसरण झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये या शेतमालास १५ हजार ६०० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचा दर मिळत आहे. त्यामुळे चिया उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या दरात सतत घसरण होत आहे. प्रामुख्याने हळद आणि चियाच्या दरात अधिक घसरण दिसत आहे. मागील काही दिवसांपूर्वी तेजीत असलेल्या हळदीचे दर घसरले असतानाच आता चियाच्या दरातही घसरण सुरू झाली आहे. वाशिम आणि बाजार समितीत चियाची खरेदी सुरू आहे. फेब्रुवारीत चियाचे दर थेट १६ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत आले.
आता मात्र पुन्हा चियाच्या दरात घसरण होत असल्याचे दिसत आहे. गुरुवार, ५ मार्चला रिसोड बाजार समितीत चियाला कमाल १५ हजार ७०० रुपये प्रती क्विंटल, तर शनिवार ७मार्चला वाशिम बाजार समितीत चियाला किमान १३ हजार ३०० ते कमाल १५ हजार ६०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत दर मिळाला. आठवडाभरातच चियाच्या दरात एक हजार रुपयांची घसरण झाल्याने चिया उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.
आवक वाढली
१४ फेब्रुवारी रोजी बाजार समितीत सुमारे ६५० क्विंटल चियाची आवक झाली होती. दरात वाढ झाल्यानंतर उत्पादकांनी विक्रीसाठी पुढाकार घेतल्याने मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी आवक वाढून सुमारे १,००० क्विंटलपर्यंत पोहोचली, तर शनिवार ७ मार्चला वाशिम बाजार समितीत तब्बल १ हजार ५०० क्विंटल चियाची आवक झाली होती.
हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा
Web Summary : Chia seed prices decline sharply after turmeric, dropping ₹1,000/quintal weekly in Washim markets. Prices reached ₹15,600/quintal, worrying farmers due to rising supply, which hit 1,500 quintals on March 7th.
Web Summary : हल्दी के बाद वाशिम बाजार में चिया के दामों में भारी गिरावट, ₹1,000/क्विंटल की साप्ताहिक गिरावट। कीमतें ₹15,600/क्विंटल तक पहुंचीं, बढ़ते आपूर्ति के कारण किसान चिंतित हैं, 7 मार्च को 1,500 क्विंटल तक पहुंची।