अनिल भंडारी
बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील चार दिवसांत ३४ हजार ८८१ किलो रेशीम कोषाची आवक झाली असून, भावही ६०० ते ६११ रुपये किलोप्रमाणे मिळाला.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात रेशीम बाजारपेठ सुरू केलेली आहे. मराठवाडा तसेच बारामती, इंदापूर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, सोलापूर आदी जिल्ह्यांमधून रेशीम कोषांची आवक या बाजारपेठेत होते.
येथील रेशीम कोष खरेदी केंद्र हे राज्यात प्रथम क्रमांकावर व देशात द्वितीय क्रमांकाचे ठरले आहे. या खरेदी केंद्राच्या माध्यमातून रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ मिळाली आहे.
२४ टन खरेदीचा विक्रम
एका दिवसात सुमारे २४ टन रेशीम कोषांची विक्रमी आवक नोंदली होती. दरम्यान, गेल्या चार दिवसांत बाजार समितीमध्ये दररोज ७ ते १० हजार किलोपर्यंत रेशीम कोषांची आवक होत आहे. १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान ३४ हजार ८८१.९ किलो रेशीम कोषाची आवक झाली.
अशी आहे आकडेवारी
दिनांक | आवक (किलो) | दर |
१५ ऑक्टोबर | ८०८४.५ | ६०१ |
१६ ऑक्टोबर | १००५५ | ६११ |
१७ ऑक्टोबर | ८९४८.४०० | ६०९ |
१८ ऑक्टोबर | ७७९३.७०० | ६११ |
बीडमध्येच रेशीम पार्क उभारा
• बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रेशीम कोष खरेदी केंद्रात एका दिवसात सुमारे २४ टन रेशीम कोषांची विक्रमी आवक नोंदवली गेली आहे. तसेच सुमारे ६,००० एकरांहून अधिक क्षेत्रावर रेशीम तुती लागवड चालू आहे.
• बाजार समितीच्या आवारात मुबलक जागा उपलब्ध असून, बीड येथे रेशीम पार्क स्थापन करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाने बीड येथेच रेशीम पार्क उभे करावे, अशी मागणी संचालक धनंजय गुंदेकर यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे केली आहे.
• याची दखल घेत आमदार क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिवांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. रेशीम उद्योगाच्या विकासासाठी बीड येथे शासनाने रेशीम पार्क उभारणी केल्यास शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल, उत्पादन क्षमता वाढेल व जिल्हा व प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे पत्रात म्हटले आहे.
Web Summary : Beed APMC witnessed a 34-tonne silk cocoon arrival in four days, fetching ₹600-611/kg. The market ranks top in Maharashtra and second nationally. A silk park proposal is under consideration to boost the local economy and aid farmers.
Web Summary : बीड एपीएमसी में चार दिनों में 34 टन रेशम कोकून की आवक हुई, जिसकी कीमत ₹600-611/kg रही। बाजार महाराष्ट्र में शीर्ष और राष्ट्रीय स्तर पर दूसरा है। स्थानीय अर्थव्यवस्था को बढ़ावा देने और किसानों की सहायता के लिए एक रेशम पार्क का प्रस्ताव विचाराधीन है।