Join us
Daily Top 2Weekly Top 5

चाकण बाजारात कांद्याची १२ हजार क्विंटल आवक; वाचा नंबर १ कांद्याला काय मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:00 IST

kanda bajar bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धाचा फटका शेतमालाला बसल्याने आवक वाढल्याने बाजारभावात घसरण झाली.

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धाचा फटका शेतमालाला बसल्याने आवक वाढल्याने बाजारभावात घसरण झाली.

कांदा, वांगी, फ्लॉवर, वाटाणा, हिरवी मिरची, टोमॅटो यांची भरपूर आवक झाल्याने भाव गडगडले. चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात पालक व मेथीची आवक वाढूनही भावात किंचित वाढ झाली. एकूण उलाढाल ६ कोटी २० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण १२ हजार क्विंटल आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक ३ हजार क्विंटलने वाढूनही कांद्याचा कमाल भाव १,४०० रूपांतर स्थिरावला.

बटाट्याची एकूण आवक १,४०० क्विंटल झाली. ही आतक स्थिर राहूनही बटाट्याला १,२०० रुपये भाव मिळाला. लसणाची एकूण आवक ५० क्विंटल झाली.

हिरव्या मिरचीची एकूण आवक ३२५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ५ हजार रुपयांपासून ते ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतमालाची आवक व बाजारभावकांदाएकूण आवक - १२,००० क्विंटलभाव क्रमांक १) १,४०० रुपयेभाव क्रमांक २) १,२०० रुपयेभाव क्रमांक ३) ८०० रुपये

बटाटाएकूण आवक - १,४०० क्विंटलभाव क्रमांक १) २,००० रुपयेभाव क्रमांक २) १,००० रुपयेभाव क्रमांक ३) ८०० रुपये.

अधिक वाचा: लाल मिरचीच्या दरात दुपटीने वाढ, मसालेही खाता आहेत भाव; वाचा किलोला किती रुपये दर?

English
हिंदी सारांश
Web Title : Chakan Market Sees 12,000 Quintals Onion Arrival; Price Details Here

Web Summary : Chakan market sees increased onion arrival (12,000 quintals) but prices remained stable. Other vegetables also saw high supply, affecting rates. Top onion price: ₹1,400.
टॅग्स :कांदामार्केट यार्डबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचाकणशेतकरीबटाटा