बदलत्या हवामानात आणि संसर्गजन्य रोगांच्या वाढत्या थोक्यात, आपल्या आहारात पोषण मूल्यांनी भरपूर असलेल्या भाज्यांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे.
सहज उपलब्ध असलेल्या शेवगा, अंबाडी आणि अळूच्या भाज्या या आरोग्यासाठी अमूल्य ठरू शकतात. शेवगा, अंबाडी आणि अळू या भाज्या केवळ चवदार नसून आरोग्यासाठीही अनमोल आहेत.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि शरीराला आवश्यक पोषण मिळवण्यासाठी या भाज्या आहारात नियमित समाविष्ट करणे गरजेचे आहे.
भाज्यांमधील पोषक गुणांचा लाभ- रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या भाज्यांमध्ये उपयुक्त गुणधर्म आहेत.- भाज्यांचे प्रकार जसे वेगवेगळे आहेत, त्याप्रमाणे प्रत्येक भाजीमध्ये मानवी शरीरासाठी उपयुक्त ठरणारे औषधी गुणधर्मही आहेत.- इतर भाज्यांप्रमाणेच या भाज्या खूप गुणकारी असतात. त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, अॅण्टीऑक्सिडंट्स, फायबर असतात.- त्यामुळे या भाज्यांमधील पोषक गुणांचा लाभ शरीराला मिळण्यासाठी या भाज्या आवर्जून खायलाच पाहिजेत, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
१) अंबाडीच्या सेवनाचे फायदे- रक्तवर्धक असल्याने अशक्तपणा दूर करते हाडांचे आरोग्य सुधारते व हाडांचा ठिसूळपणा कमी करते.- डोळ्यांसाठी फायदेशीर व्हिटॅमिन 'अ' चा उत्तम स्रोत केसांची वाढ सुधारते व केस गळती कमी करते रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.- अंबाडी पोषण संपन्न हिरवळीचा खजिना आहे. अंबाडीची भाजी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
२) अळूच्या सेवनाचे आरोग्यदायी फायदे- अळूची भाजी हृदयाच्या आरोग्यासाठी वरदान आहे.- अळू ही एक पारंपरिक आणि बहुपयोगी भाजी आहे.- तिच्या पानांपासून वड्या आणि विविध पदार्थ तयार केले जातात.- हृदयरोगाचा धोका कमी करते कर्करोगाविरोधी गुणधर्म असलेली भाजी ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत पचनसंस्था सुधारते.- अपचन, गॅस समस्यांपासून आराम मिळतो हाडांचे आरोग्य सुधारते आणि अशक्तपणा दूर करतो.
४) शेवगा आरोग्यदायी फायदे- शेवग्याची भाजी घरगुती आहाराचा महत्त्वाचा भाग आहे.- या भाजीमध्ये लोह, अँटी ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व 'ए', 'सी' आणि 'ई' मुबलक प्रमाणात असतात.- मधुमेह, उच्च रक्तदाब व कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी उपयुक्त हिमोग्लोबीनची पातळी सुधारते.- अशक्तपणा दूर करतो यकृत व मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.- शरीर डिटॉक्स करण्यात मदत संधिवात, दमा आणि खोकला यांसाठी उपयुक्त आहे.
अधिक वाचा: कांद्याच्या वजनात घट होऊ नये म्हणून कांदा काढणी व कापणी करताना हे नक्की करा