आशुतोष कस्तुरेकुंडल : हल्ली दहा रुपयांच्या वस्तूपासून लाखांच्या वस्तूपर्यंत एटीएमद्वारे पैसे दिले जातात. पण, या एटीएमवरती ज्या सुविधा आहेत त्याबाबत मात्र ग्राहक अनभिज्ञ आहेत. तुमच्या खिशात असलेल्या एटीएमवरती लाखांचा विमा दिला जातो, हे ऐकून धक्का बसला नाही तर नवलच..!
अनेक बँका त्यांच्या डेबिट कार्डसोबत मोफत विमा संरक्षण देतात, जसे की अपघाती मृत्यू, खरेदी संरक्षण आणि विमान प्रवासातील अपघात संरक्षण, विमा किती असेल आणि कोणत्या प्रकारचा असेल, हे त्या बँकेच्या आणि डेबिट कार्डच्या प्रकारावर अवलंबून असते.
अपघाती मृत्यू विमाकाही डेबिट कार्डवर, कार्डधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास विमा संरक्षण मिळते, जे त्याच्या कायदेशीर वारसाला आर्थिक मदत करते.
कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारकप्रत्येक बँकेच्या डेबिट कार्डवर मिळणारे विमा संरक्षण वेगवेगळे असू शकते. विमा संरक्षण मिळवण्यासाठी काही अटी आणि नियम असू शकतात. विमा संरक्षणाचा दावा करण्यासाठी तुम्हाला बँकेने दिलेल्या नियमांनुसार कागदपत्रे सादर करावी लागतील.
खरेदी संरक्षण विमाकाही डेबिट कार्डवर, तुम्ही केलेल्या खरेदीचे संरक्षण केले जाते, जसे की खरेदीनंतर काही दिवसांच्या आत वस्तू हरवल्यास किंवा खराब झाल्यास.
किमान व्यवहाराची गरजअपघात होण्याआधी किमान ३० दिवस अगोदर कार्डचा वापर झालेला असणे बंधनकारक आहे. फक्त बॅलन्स जरी चेक केला तरी क्लेम होऊ शकतो.
कार्ड चोरी झाल्यास संरक्षणकाही डेबिट कार्ड, तुम्हाला कार्ड हरवल्यास किंवा चोरी झाल्यास, फसवणूक झाल्यास संरक्षण देतात. विमा संरक्षण मिळवण्यासाठी बँकेच्या वेबसाइटला भेट देऊन कार्डवर कोणते विमा संरक्षण उपलब्ध आहे, ते तपासा.
ऑगस्ट २०१८ नंतर उघडलेल्या जनधन खात्यांतर्गत रूपे डेबिट कार्डधारकांना २ लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षण प्राप्त असून, याकरिता एटीएम कार्डचा नियमित वापर आवश्यक आहे. - विश्वास वेताळ, व्यवस्थापक अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया, सांगली
अधिक वाचा: विवाहित मुलीला वडिलोपार्जित जमिनीत वाटा मिळतो का? काय आहे नियम? वाचा सविस्तर