Join us

येवला होतंय अद्रक हब; ऊस, डाळिंब, द्राक्ष, कांदा पिकांना फाटा देत शेतकऱ्यांची अद्रक पिकाला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 14:12 IST

Ginger Farming In yeola : येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे कांदा याबरोबरच शेतकऱ्यांनी शेतात शेततळे उभारून डाळिंब, द्राक्ष, ऊस या पिकांची ही मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे, आता ऊस, कांदा या पिकांना पर्याय म्हणून अद्रक पिकाची लागवड केली आहे.

नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे कांदा याबरोबरच शेतकऱ्यांनी शेतात शेततळे उभारून डाळिंब, द्राक्ष, ऊस या पिकांची ही मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे, आता ऊस, कांदा या पिकांना पर्याय म्हणून अद्रक पिकाची लागवड केली आहे.

गेली अनेक वर्षांपासून मोजकेच शेतकरी हे पीक घेत होते, पण मागील वर्षी शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे भाव मिळाला, चार पैसे शेतकऱ्यांच्या पदरात पडले, यावर्षी येवला तालुक्यात अंदाजे साडेतीनशे हेक्टरवर अद्रक पिकाची शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. 

तसेच अनेक शेतकऱ्यांचे आले पिकाची काढणी सुरू झाली आहे. हे पीक छत्रपती संभाजीनगर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये घेतले जात होते, परंतु आता मात्र नाशिक जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये अद्रक हे पीक घेतले जात आहे.

मागील वर्षी शेतकऱ्यांना आठ ते दहा हजारांचा भाव हा जागेवर मिळाला होता, पण यावर्षी मात्र आले पिकाचे क्षेत्र वाढल्यामुळे दरात घसरत होऊन त्याचे भाव एका क्विंटलला दोन हजारांपासून पंचवीसशे रुपयांपर्यंत भाव मिळत असून, एका एकरामध्ये साधारणपणे दीडशे ते १८० क्विंटलपर्यंत अगक उत्पादन निघते.

अद्रक पिकाचा कालावधी सहा ते १८ महिन्यांपर्यंत असून, लागवड केल्यानंतर साधारणपणे सहा महिन्यांनंतर आपण ते विक्रीसाठी काढू शकतो, पण बाजार भाव कमी असेल, तर ते आपण १८ महिन्यांपर्यंत केव्हाही बाजारभावाप्रमाणे काढू शकतो.

येवला तालुक्याच्या अंदरसूल, उंदीरवाडी, रस्ते सुरेगाव, देवठाण, जळगाव नेऊर, गवंडगाव, बोकटे, सायगाव, नेऊरगाव, परिसरात मोठ्या प्रमाणात आल्याचे पीक घेतले जाते. या परिसरात आज मोठ्या प्रमाणात बेणे प्लॉट तयार असून, शेतकरी वर्ग आले लागवडीसाठी खरेदी करत आहे.

शेततळे खोदकाम, शेततळे अस्तरीकरण, ठिबक सिंचन व सोलार पंप इत्यादी योजनांमुळे शेतकरी पारंपरिक पिकाकडून अद्रकसारख्या पिकाकडे वळले आहे. अद्रकपासून सुंठ उत्पादन प्रकल्पसाठी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग प्रोत्साहन योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी अर्ज केल्यास त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल. - हितेंद्र पगार, मंडळ कृषी अधिकारी, अंदरसूल.

मी मागील वर्षी तीन एकर क्षेत्रावर अनकची लागवड केली होती. त्यामध्ये आठ ते नऊ हजार रुपये भाव मिळाल्याने चार पैसे पदरात पडले, म्हणून यावर्षी पाच एकर क्षेत्रावर अद्रक पिकाची लागवड केली आहे. भाव वाढीनुसार अद्रक काढता येत असल्याने पुढे भाव वाढतील, अशी आशा आहे. - नवनाथ सोनवणे, अद्रक उत्पादक शेतकरी, जळगाव नेऊर.

हेही वाचा : Onion Crop Insurance Fraud : नावावर नाही सात बारा तरी भरला कांद्याचा पीक विमा

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रशेतकरीकांदानाशिकबाजार