Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन

Yashwantrao Chavan Maharashtra Open University Pro-Chancellor Prof. Jogendra Singh Bisen | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदाचा कार्यभार प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी दिनांक 04 नोव्हेंबर, 2023 रोजी स्विकारला आहे. यापुर्वी ते ...

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदाचा कार्यभार प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी दिनांक 04 नोव्हेंबर, 2023 रोजी स्विकारला आहे. यापुर्वी ते ...

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदाचा कार्यभार प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी दिनांक 04 नोव्हेंबर, 2023 रोजी स्विकारला आहे. यापुर्वी ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे प्र-कुलगुरू होते. प्रा. बिसेन यांचे शिक्षण एम. ए., एम. फिल., पी. एच. डी., बी.पी. एड. असून, मागील 27 वर्षे दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे हिंदी विषयाचे प्राध्यापक व नंतर प्राचार्य होते.
त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य हिन्दी साहित्य अकादमीचा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय एकता पुरस्कार आणि इतरही बरेच सन्मानप्राप्त झालेले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या अंमलबजावणीसाठी शासनाच्यावतीने गठित करण्यात आलेल्या सुकाणू समितीचे ते सदस्य आहेत.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन विद्यापीठात स्वागत व अभिनंदन केले. याप्रसंगी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी विद्यापीठाबद्दल  आणि विद्यापीठात सुरु होणाऱ्या विविध नविन उपक्रमांबद्दल तसेच अभ्यासक्रमांबद्दल माहिती दिली.  आपल्याकडे प्राचार्य तसेच प्र-कुलगुरू पदाचा अनुभव असून, त्याचा मुक्त विद्यापीठास नक्कीच उपयोग होईल अशी आशा त्यांनी प्र-कुलगुरू प्रा. बिसेन यांच्याकडे व्यक्त केली. मुक्त विद्यापीठ हे एक परिवार म्हणून काम करते, असेही त्यांनी याप्रसंगी नमूद केले. याप्रसंगी प्र-कुलगुरूंना कुलगुरूंच्या हस्ते विद्यापीठ कायदा आणि गॅझेटची पुस्तीका देण्यात आली. 

आपले विचार व्यक्त करतांना प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी सांगितले की, मुक्त विद्यापीठाने मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मुक्त विद्यापीठाचे आभार मानले. मा. कुलगुरूंनी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले जाईल. मी पारंपारीक विद्यापीठातून जरी आलो असलो तरी, मुक्त विद्यापीठाबद्दल पुर्णपणे जाणून घेऊन, विद्यापीठासाठी जास्तीत योगदान कसे देता येईल आणि विद्यापीठाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करेल असेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी त्यांनी विद्यापीठ परिसरातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पअर्पण करून वंदन केले. 

याप्रसंगी विद्यापीठाचे वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख, अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्राचे संचालक डॉ. राम ठाकर, ग्रंथालय प्रमुख, डॉ. मधुकर शेवाळे, जनसंपर्क अधिकारी श्री. महेंद्र बनसोडे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. नितीन ठोके, उपकुलसचिव डॉ. कैलास बोरसे, डॉ. चंद्रकांत पवार, प्रा. रमेश धनेश्वर उपस्थित होते.

Web Title: Yashwantrao Chavan Maharashtra Open University Pro-Chancellor Prof. Jogendra Singh Bisen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.