Join us

अबब! लसूण खाण्याचे किती 'हे' फायदे; विविध आजारांवर गुणकारी आरोग्यवर्धक 'लसूण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 16:46 IST

Health Benefits Of Garlic : लसूण हा केवळ स्वयंपाकघरातील मसाल्याचा घटक नसून एक प्रभावी औषधी घटकदेखील आहे. त्यामध्ये बी आणि सी जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात जे शरीराच्या एकूण कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक मानले जातात.

लसूण हा केवळ स्वयंपाकघरातील मसाल्याचा घटक नसून एक प्रभावी औषधी घटकदेखील आहे. त्यामध्ये बी आणि सी जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात जे शरीराच्या एकूण कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक मानले जातात.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते दररोज कच्च्या लसणाच्या पाकळ्या खालल्यास शरीरातील घातक विषारी घटक बाहेर फेकले जातात तसेच प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

मधुमेहावर नियंत्रणासाठी प्रभावी

मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी कच्चा लसूण लाभदायक ठरतो. यात असणारे घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जर कच्च्या लसणाची चव सहन होत नसेल तर थोडा भाजूनही तो सेवन करता येतो. मात्र शक्य असल्यास कच्च्या स्वरूपातच घेणं जास्त उपयुक्त ठरतं. आहारतज्ज्ञांच्या मते रोज सकाळी उपाशीपोटी कच्चा लसूण घेणे, मधुमेहावर नियंत्रण मिळवण्याचा नैसर्गिक मार्ग ठरू शकतो.

कोलेस्टेरॉलसाठी नैसर्गिक उपाय

आजकालच्या बदललेल्या आहारशैलीमुळे कोलेस्टेरॉलची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लसणाचा वापर अत्यंत फायदेशीर मानला जातो. लसणात असणारे घटक रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करून रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यास मदत करतात. नियमितपणे कच्चा लसूण घेतल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो, असा वैद्यकीय सल्ला दिला जातो.

लसणाचे योग्य सेवन कसे करावे?

काहीजण लसूण शिजवून खाण्याचा सल्ला देतात मात्र त्यामध्ये असणारे ‘एलिसिन’ हे महत्त्वाचे रसायन उष्णतेमुळे नष्ट होते. त्यामुळे जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी लसूण कच्चाच खाणे उचित ठरते. रोज सकाळी ४-५ पाकळ्या सोलून, पाण्यासोबत घेणे हा सोपा आणि प्रभावी उपाय आहे. कच्चा लसूण सहन न झाल्यास हलकासा भाजून घेणे देखील चालू शकते.

निसर्गसिद्ध उपायांची ताकद

आपल्या आजूबाजूला असणारे अनेक नैसर्गिक घटक हे औषधांइतकेच प्रभावी असतात. लसूण हा त्यातील एक महत्वाचा घटक आहे. त्याचा नियमित, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास अनेक आजारांपासून बचाव करता येतो.

टीप : वरील सर्व माहिती हि सामान्य आहेत. तरी कोणताही वैद्यकीय प्रयोग सुरू करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा : गाजरगवताची ॲलर्जी झाल्यास काय कराल? कशी घ्याल काळजी; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सभाज्याशेती क्षेत्रअन्न