Join us

World Cancer Day : शेतकरी महिलांनो..! कॅन्सर बरा होऊ शकतो पण काळजी घ्यायला हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 18:53 IST

Cancer कर्करोग एक शब्द, पण त्यामागे दडलेली वेदना, भीती आणि संघर्ष किती मोठा आहे, हे फक्त तो सहन करणाऱ्यालाच माहीत.

कर्करोग एक शब्द, पण त्यामागे दडलेली वेदना, भीती आणि संघर्ष किती मोठा आहे, हे फक्त तो सहन करणाऱ्यालाच माहीत. जागतिक कर्करोग दिन हा दिवस केवळ माहिती देण्यासाठी नाही, तर प्रत्येक रुग्णाला आणि त्यांच्या कुटुंबाला सांगण्यासाठी आहे की, तुम्ही एकटे नाहीत!

कर्करोग म्हणजे केवळ एक आजार नाही, हा केवळ शरीरावर होणारा परिणाम नाही, तर मनासह संपूर्ण आयुष्याला हादरवून सोडणारा प्रवास आहे.

शेतकरी महिला, मजूर यांना त्यांच्या कामातून वेळ मिळत नसल्याने अनेकदा त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते व आजार झालेला ही समजत नाही व तपासणी केल्यानंतर आजार चौथ्या स्टेजमध्ये गेलेला असतो अशावेळी उपचार करणे कठीण जाते.

जेव्हा एखाद्याला कर्करोग झाल्याचे कळते, तेव्हा त्याचे जगच बदलून जाते. आशा आणि भीती यांचा संघर्ष सुरू होतो. प्रत्येक केमोथेरपीनंतर कमकुवत झालेलं शरीर, केस गळून गेलेलं डोकं, पण तरीही डोळ्यात आशेचा एक किरण दिसतो, मी यातून बाहेर पडणार! 

कर्करोग होण्याची अनेक कारणे आहेत. पण सावधगिरी बाळगणे हा एकच पर्याय आहे. तंबाखूजन्य पदार्थ सोडणे, पौष्टिक खाणे, व्यायाम करणे, तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे यातून हा आजार टाळता येतो.

समजा आजार झाल्यास लवकर उपचार सुरु होऊ शकतात. आणि मुख्य ज्यांना कर्करोग झाला आहे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला इतर व्यक्ती चांगली मदत करु शकतात.

कर्करोगासह जगणाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार आणि सकारात्मकता द्यायला हवी. नकारात्मकता टाळून अशास्त्रीय माहितीपासून लांब राहायला हवं.

कर्करोगावरील उपचार दिवसेंदिवस सुधारत आहेत. अनेक रुग्ण यातून पूर्णपणे बरे होतात. गरज आहे ती वेळेत निदान आणि उपचारांची.

म्हणून स्वतःला किंवा इतरांना कर्करोगाची काही लक्षणे दिसली तर ती लपवू नका. लवकर निदान म्हणजे निम्मा विजय. आपण एकमेकांना मदत करुन या आजारावर मात करु. 

भीती, लाजेपोटी जीव गमावतात - कॅन्सरचे भारतात २०० पेक्षा जास्त प्रकार आहेत; पण त्यातील महत्त्वाचे ४ प्रकार आहेत.- यातील कार्सिनोमा या सर्वाधिक आढळणाऱ्या प्रकारात भारतात जवळपास १२ लाख रुग्ण नव्याने आढळतात.- अनेकदा रुग्ण आपल्याला कॅन्सर झाला आहे, हे माहीत असूनही रुग्ण उपचार घेण्यासाठी गंभीर नसतात.- भीती व लाजेपोटी अनेकांना यामुळे जीव गमवावा लागतो.- रुग्ण कॅन्सरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये रुग्णालयात दाखल होतात; पण तोपर्यंत रुग्णावर उपचार करणं डॉक्टरांना कठीण होऊन जातं.

गर्भाशयाच्या कॅन्सरचा वाढता धोका - स्त्रियांमध्ये ब्रेस्ट आणि गर्भाशयाचा कॅन्सर, तर पुरुषांमध्ये डोके आणि मानेचा कॅन्सर अशा कॅन्सरची लक्षणं लवकर दिसतात.- स्त्रियांना होणाऱ्या कॅन्सरपैकी सर्वांत गंभीर कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग).- स्त्रियांनी स्वपरीक्षण किंवा दरवर्षी एकदा तरी स्क्रीनिंग करून घेतलं पाहिजे. याशिवाय गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाणही वाढते आहे.- हा आजार तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजला आढळला तर त्यांना वाचवणं कठीण होऊन जातं. ३० टक्के कॅन्सर रोखता येऊ शकतो.- जास्त लठ्ठपणा, ओटीपोटात लठ्ठपणा असेही अनेक प्रकार कॅन्सरमध्ये आहेत.

टॅग्स :कर्करोगमहिलाशेतकरीशेतीआरोग्यहेल्थ टिप्सकॅन्सर जनजागृती