Lokmat Agro >शेतशिवार > Women Success Story : लोणच्याच्या विक्रीतून ३० लाखांची उलाढाल करणाऱ्या रेखाताईंचा यशस्वी प्रवास

Women Success Story : लोणच्याच्या विक्रीतून ३० लाखांची उलाढाल करणाऱ्या रेखाताईंचा यशस्वी प्रवास

Women Success Story: The successful journey of Rekhatai, who earned a turnover of Rs 30 lakhs from selling pickles | Women Success Story : लोणच्याच्या विक्रीतून ३० लाखांची उलाढाल करणाऱ्या रेखाताईंचा यशस्वी प्रवास

Women Success Story : लोणच्याच्या विक्रीतून ३० लाखांची उलाढाल करणाऱ्या रेखाताईंचा यशस्वी प्रवास

Women Success Story : कोणतीही औद्योगिक पार्श्वभूमी नसताना खुलताबाद तालुक्यातील गदाना येथील रेखा चव्हाण यांची काहाणी वाचा सविस्तर

Women Success Story : कोणतीही औद्योगिक पार्श्वभूमी नसताना खुलताबाद तालुक्यातील गदाना येथील रेखा चव्हाण यांची काहाणी वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

बापू गोदावरी सोळुंके

कोणतीही औद्योगिक पार्श्वभूमी नसताना खुलताबाद तालुक्यातील गदाना येथील रेखा चव्हाण यांनी त्यांचा 'आई लोणचं' या नावाने लोणचं बनविण्याचा उद्योग सुरू केला. आज यातून त्यांची वार्षिक ३० लाख रुपयांची उलाढाल आहे. (Women Success Story)

एवढेच नव्हे तर चार ते पाच जणींना त्यांनी रोजगारही दिला आहे. गदाना येथे महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून २०१२ पासून रेखा काम करतात.

बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेने आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाले पाहिजे, असे त्यांना वाटते. उद्योग, व्यवसाय करायचा म्हटलं की, आर्थिक भांडवलाची गरज भासते. शिवाय उद्योग यशस्वी होईल अथवा नाही, याविषयी शंका असल्याने उद्योग करण्याचे धाडस बचत गटातील महिला करत नव्हत्या. (Women Success Story)

कोविड कालावधीत रेखा यांच्या आईने तयार केलेले आंब्याचे लोणचे अनेकांना आवडल्याचे सांगितले होते. यामुळे त्यांनी लोणचे बनवून विक्री करण्याचा निर्णय घेतला.

यादरम्यान बचत गटांचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या हरयाणा येथील मंजिरी शर्मा यांच्यासोबत त्यांची भेट झाली. मंजिरी फार्म दीदी या बॅण्डच्या नावाखाली विविध उत्पादने विक्रीचा व्यवसाय करतात.

त्यांनी रेखा यांना दरमहा एक क्विंटल लोणच्याची ऑर्डर दिली. आपला माल अधिक लोकांपर्यंत पोहोचावा, याकरिता त्या विविध ठिकाणी त्यांचे स्टॉल लावतात. त्यांनी हर्सुल जटवाडा रोड येथे एक गाळा विकत घेऊन आऊटलेट सुरू केले.

आंब्यासोबतच मिरची आणि लिंबाचे लोणचेही बनवायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी पॅकेजिंग मशीन खरेदी केली. यामुळे व्यवसायाला स्मार्ट लुक आल्याचे त्यांनी सांगितले.

कंपनीत महिलांनाच प्राधान्य

रेखा यांनी ओवी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे. आज या कंपनीचे ७५० सभासद आहेत. या कंपनीच्या सीईओ आणि अकाऊंटंटही महिलाच असल्याचे त्यांनी सांगितले. महिला या सर्व क्षेत्रांत उत्तमरीत्या काम करू शकतात.  

महिलांनी केवळ धाडस करणे आवश्यक असते, असे त्यांनी नमूद केले. ओवी शेतकरी उत्पादक कंपनीला नाबार्डने १५ लाख रुपये अनुदान दिले.

आता कंपनीकडून शेतकरी उपयोगी कामे हाती घेण्यात येत असल्याचे रेखा यांनी सांगितले.

हे ही वाचा सविस्तर : Women Day Special: मजुरी करणाऱ्या लक्ष्मीने मेहनतीतून हळदीला दिला सोनेरी रंग

Web Title: Women Success Story: The successful journey of Rekhatai, who earned a turnover of Rs 30 lakhs from selling pickles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.