Join us
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या नोकरीतील अडकलेले पीएफचे पैसे काढणे झाले आता सोपे; सुरु होतंय 'हे' नवीन पोर्टल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 15:56 IST

pf money withdraw तुमच्या जुन्या नोकरीतील अशा पीएफचे पैसे अडकले आहेत? किंवा जुन्या पीएफ खात्याचा नंबर माहीत नसल्यामुळे ते पैसे विसरून गेला आहात? तर आता काळजी करण्याची गरज नाही.

तुमच्या जुन्या नोकरीतील अशा पीएफचे पैसे अडकले आहेत? किंवा जुन्या पीएफ खात्याचा नंबर माहीत नसल्यामुळे ते पैसे विसरून गेला आहात? तर आता काळजी करण्याची गरज नाही.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) सदस्यांसाठी 'ई-प्राप्ती' नावाचे विशेष वेब पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली आहे.

यामुळे आता कोट्यवधी कर्मचाऱ्यांना त्यांची अनेक वर्षांपासून बंद असलेली खाती पुन्हा सुरू करता येणार आहेत. हे नवीन पोर्टल पूर्णपणे 'आधार' आधारित पडताळणीवर काम करेल.

पोर्टलचा फायदा कुणाला?◼️ खाती अनेक वर्षांपासून बंद आहेत किंवा ज्यांना जुना पीएफ नंबर आठवत नाही.◼️ आधार पडताळणीद्वारे बंद खाते शोधता येणार आणि सक्रिय करता येणार.◼️ खाते यूएएनशी जोडल्यानंतर सदस्यांना आपली माहिती अद्ययावत करता येईल.◼️ यूएएन नंबर नसलेली जुनी खातीही आता मुख्य खात्याला जोडता येतील.

काय आहे 'ई-प्राप्ती' पोर्टल?◼️ या पोर्टलचे पूर्ण नाव 'एम्प्लॉई प्रॉविडेंट फंड आधार-बेस्ड अ‍ॅक्सेस पोर्टल फॉर ट्रॅकिंग इनऑपरेटिव्ह अकाऊंट्स' असे आहे.◼️ सुरुवातीला ओळखपत्राचे पुरावे आहेत, त्यांना याचा लाभ मिळेल.◼️ मात्र, दुसऱ्या टप्प्यात जुन्या खात्याचा तपशील नसेल त्यांनीही सुविधा दिली जाईल.

अधिक वाचा: उष्णतेपासून संरक्षणासाठी वाचा खास सहा सल्ले; अन्यथा 'या' तीन अवयवांना बसतील मोठे फटके

English
हिंदी सारांश
Web Title : Easier to withdraw old PF money with 'E-Prapti' portal.

Web Summary : With EPFO's 'E-Prapti' portal, withdrawing old, stuck PF money becomes easier. Millions can reactivate dormant accounts using Aadhaar verification. Update information, link old accounts without UAN to main accounts. The portal simplifies accessing and managing previously inaccessible PF funds.
टॅग्स :भविष्य निर्वाह निधीबँकनोकरीकेंद्र सरकारसरकारआधार कार्डऑनलाइन