Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीएम किसान योजेनेतून अडीच लाख शेतकऱ्यांना का वगळले? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:08 IST

pm kisan yojana update पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ एका कुटुंबात एकालाच देण्याच्या निकषामुळे २०व्या हप्त्याच्या तुलनेत २१ व्या हप्त्यावेळी देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले आहे.

पीएम किसानच्या २० हप्त्यांची रक्कम आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना २१ वा हप्ता १९ नोव्हेंबरला मिळणार आहे.पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ एका कुटुंबात एकालाच देण्याच्या निकषामुळे २०व्या हप्त्याच्या तुलनेत २१व्या हप्त्यावेळी देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले आहे.

केंद्र सरकारने यासाठी आधार, प्राप्तिकर आणि शिधापत्रिका पोर्टलच्या आधारे या शेतकरी कुटुंबांची सदस्यसंख्या आणि उत्पन्न तपासण्यास सुरुवात केली आहे.

त्यानुसार ही घट दिसून येत आहे. यापूर्वी २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी ९१ लाख ९१ हजार शेतकऱ्यांना दिला होता.

२१ व्या हप्त्यासाठी किती शेतकरी पात्र?राज्यातील २० लाख ४१ हजार २४१ शेतकरी पात्र आहेत. या संख्येनुसार १ हजार ८०८ कोटी २५ लाख रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. मात्र, २०व्या हप्त्याच्या तुलनेत यात तब्बल २ लाख ५० हजार शेतकऱ्यांची घट झाली.

योजनेतील सुधारणा समजून घ्या◼️ पीएम किसान योजनेत लाभार्थी कुटुंबाच्या व्याख्येप्रमाणे पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील मुले मिळून हा हप्ता आहे.◼️ मात्र, काही कुटुंबांनी पती व पत्नी या दोघांनीही नोंदणी केली असल्याने, अशा कुटुंबांमध्ये जर दोघांच्याही नावे जमीन असेल तर पतीचा हप्ता बंद केला आहे व पत्नीचा सुरू ठेवला आहे.

अधिक वाचा: स्टँप ड्यूटी वाचविण्यासाठी पळवाट काढताय? वाचा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा 'हा' नवीन निर्णय

English
हिंदी सारांश
Web Title : Why Were 2.5 Lakh Farmers Excluded from PM Kisan Yojana?

Web Summary : Around 2.5 lakh farmers were excluded from the 21st PM Kisan installment due to stricter eligibility criteria, focusing on family income and land ownership. The scheme now ensures only one beneficiary per family, impacting the number of eligible recipients, now at 20.41 lakh farmers.
टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेतकरीराज्य सरकारकेंद्र सरकारसरकारकृषी योजनासरकारी योजनाइन्कम टॅक्स