lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > लाखो शेतकरी १९ मार्चला अन्नत्याग करून का पाळतात सहवेदना दिवस?

लाखो शेतकरी १९ मार्चला अन्नत्याग करून का पाळतात सहवेदना दिवस?

Why lakhs of farmers observe Sahavedana Day giving up food on March 19 kisanputra andolan | लाखो शेतकरी १९ मार्चला अन्नत्याग करून का पाळतात सहवेदना दिवस?

लाखो शेतकरी १९ मार्चला अन्नत्याग करून का पाळतात सहवेदना दिवस?

किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब हे २०१७ पासून १९ मार्च रोजी अन्नत्याग किंवा उपवास करून सहवेदना दिवस पाळतात.

किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब हे २०१७ पासून १९ मार्च रोजी अन्नत्याग किंवा उपवास करून सहवेदना दिवस पाळतात.

शेअर :

Join us
Join usNext

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंबाजोगाई येथील किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब हे २०१७ पासून १९ मार्च रोजी अन्नत्याग किंवा उपवास करून सहवेदना दिवस पाळतात. त्यांना अनेक शेतकरी, नेते आणि कार्यकर्ते साथ देत असतात. शेतकरी हा सरकारच्या अनेक कायद्यांमध्ये गुरफटला आहे. त्याला अनेक प्रश्नांनी विळखा घातला आहे पण आपण कायदे बदलू शकत नाहीत असं म्हणत त्यांनी ही चळवळ उभी केली असून आमुळे आपल्या संकल्पाला बळ येईल असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या अन्नत्यागामागची भूमिका नेमकी काय आहे जाणून घेऊयात...

१९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे यांच्या कुटुंबाने आत्महत्या केली होती, साहेबराव करपे हे यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाणचे राहणारे. विजबिल भरू न शकल्याने त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. उभा गहू जळू लागला म्हणून व्यथित झालेल्या साहेबरावांनी टोकाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गेल्या ३८ वर्षात एकही दिवस असा गेला नाही की, ज्या दिवशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही.

रोज आत्महत्या होत आहेत. या वर्षी मागच्या वर्षांहून जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. सरकारी आकडेवारी फसवी आहे. खरे आकडे किमान दुप्पट आहेत. त्या पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बेरोजगार मुलामुलींनी केल्या आहेत. आत्महत्येचा प्रयत्न अयशस्वी झालेल्यांची कोठेच नोंद नाही. मरत मरत जगणाऱ्यांची संख्या कशी मोजणार! हे शेतकऱ्यांवरचे खरे अरिष्ट आहे व त्याने आज भीषण रूप घेतले आहे. शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे पण त्याकडे सरकार, विरोधी पक्ष कोणीच गंभीरपणे पहात नाही. सरकारे बदलली पण शेतकऱ्यांचे दुःख कमी झाले नाही.

मूळ कारण काय?
शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण तीन कायदे असल्याचं ते सांगतात. 1)कमाल शेतजमीन धारणा कायदा 2)आवश्यक वस्तू कायदा 3)जमीन अधिग्रहण कायदा ह्या तीन कायद्यांनी तयार केलेला विळखा आहे. या शिवाय अनेक कायद्यांनी शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आणला आहे.

मी काय करू शकतो? 
'आपण सरकार नाहीत. कायदे बदलणे आपल्या हातात नाही. आपण निवडणूक लढून निवडून येण्याची शक्यता नाही कारण निवडून येण्यासाठी लागणारा पैसा, झुंडी खेळवण्याचा कोडगेपणा, जनतेची फसवणूक करण्याची लबाडी आपल्याकडे नाही. कोणाला गोळ्या घालून हा प्रश्न सुटणारा नाही. आपण एक सामान्य नागरिक आहोत. मी विचार करून ठरवले आहे की, आपण एक दिवस अन्नत्याग/उपवास करू शकतो. तेथून सुरुवात करू. मला माहित आहे की, सरकारवर माझ्या एक दिवसाच्या उपवासाने परिणाम होणार नाही! पण मला हे पक्के माहित आहे की, माझ्या एक दिवस उपवासाने माझा संकल्प बलवत्तर होईल. एक एक करीत लाखो लोक जेंव्हा उपवास/अन्नत्याग करतील तेव्हा निश्चित त्याचा परिणाम दिसून येईल' असं हबीब सांगतात.


आत्महत्या केलेलता तमाम शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, माझी सहवेदना व्यक्त करण्यासाठी, मी 19 मार्च रोजी एक दिवस उपोषण/उपवास/अन्नत्याग करणार आहे. तुम्हीही करावे, प्रत्येक किसानपुत्राने आणि पुत्रीने करावे. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी बसून करता येत नसेल तर आपले काम करता करता सुद्धा हा उपवास करू शकता असं अवाहन अमर हबीब यांनी केलं आहे.

- अमर हबीब  (किसानपुत्र आंदोलन) आंबाजोगाई

Web Title: Why lakhs of farmers observe Sahavedana Day giving up food on March 19 kisanputra andolan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.