Join us

भारतातून कोणकोणत्या कृषी मालांची कुठे होतेय निर्यात? वाचा सविस्तर माहिती

By रविंद्र जाधव | Updated: January 9, 2025 19:59 IST

Agriculture commodities exported from India : भारत हा कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेला एक महत्त्वाचा देश आहे. जिथून विविध प्रकारच्या कृषि मालांची निर्यात जगभरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते.

भारत हा कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेला एक महत्त्वाचा देश आहे. भारतातून विविध प्रकारच्या कृषि मालांची निर्यात जगभरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते.

भारतीय कृषी माल जसे की तांदूळ, गहू, साखर, मसाले, तेलबियांची बिया, कापूस, भाज्या, फळे आणि इतर उत्पादने, जगभरातील विविध देशांमध्ये पाठवली जातात. या निर्यातीला असलेल्या बाजारपेठा उत्पादनाच्या निर्यातीत महत्त्वाची भूमिका बजावतात.

याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय कृषि माल निर्यातीस उपलब्ध मुल्य बाजारपेठा कोणकोणत्या आहेत त्यांची माहिती.

अ.क्र.कृषि माल व उत्पादनेमहत्वाचे देश
१ मांसमलेशिया, अमेरिका, फिलीपाईन, ओमा, मॉरिशस
२ कांदाअमेरिका, मलेशिया, सिंगापूर, सौदी अरेबिया
३ आंबे व गरअमेरिका, नेदरलँड, इंग्लंड, जर्मनी, सौदी अरेबिया, कुवैत
४ काजूअमेरिका, नेदरलँड, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, सिंगापूर, इटली, फ्रान्स, जर्मनी, इजिप्त
५ कॉफीशिया, इटली, अमेरिका, जपान, जर्मनी
६ चहारशिया, अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, जपान
७ मिरेअमेरिका, रशिया, कॅनडा, इंग्लंड, फ्रान्स
८ भुईमूगइंग्लंड, रशिया, सिंगापूर, फिलीपाईन्स, नेदरलँड
९ भातअरब देश, अमेरिका, ईयु
१० तंबाखूअमेरिका, रशिया, जपान, इंग्लंड, जर्मनी
११ मासे व उत्पादनेजपान, अमेरिका, सिंगापूर, हाँगकाँग, बांग्लादेश, मलेशिया, तैवान
१२ साखर व उत्पादनेपाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, अमेरिका
१३ कापूसबांग्लादेश, बेल्जिअम, फ्रान्स, जर्मनी, जपान, मलेशिया
१४ कडधान्यश्रीलंका, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, कॅनडा, इजिप्त, सिंगापूर
१५ केळीकुवैत, नेपाळ, नेदरलँड, ओमान, सौदी अरेबिया, स्वित्झरलैंड
१६ लिंबू वर्गिय फळेबहारिन, नेपाळ, अमेरिका
१७ द्राक्षेऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, स्पेन
१८ पपयाबहारिन, कुवैत, सौदी अरेबिया
१९ डाळिंब, बोर, चिकूबेल्जिअम अमेरिका
२० चिंचइजिप्त, ओमान, सौदी अरेबिया, सैबेरिया, अमेरिका
२१ बटाटाश्रीलंका
२२ काकडी वर्गीयऑस्ट्रेलिया, फ्रान्स, नेदरलँड, स्पेन
२३ आळंबी व हिरवी मिरचीबांगलादेश, कॅनडा, कुवैत, नेदरलँड, सौदी अरेबिया, स्पेन

स्त्रोत - कृषि दैनंदिनी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.

हेही वाचा : Profitable Farming Formula : एकात्मिक शेती पद्धतीद्वारे उत्पादनात होईल वाढ; आर्थिकतेची भरभराट

टॅग्स :शेती क्षेत्रफळेभाज्याशेतीशेतकरीबाजार