लिंबू, संत्री, मोसंबी अशा वर्गात महाळुंग/गळलिंबू हेही एक अत्यंत रुचकर असे फळ आहे. फळ साधारण पेरूच्या आकाराचे; पण लिंबापेक्षा सात-आठ पींनी मोठे असते.
फळाची साल बरीच जाड असते. फळाचा मध्य भाग आंबट असतो. म्हाळुंग एक औषध म्हणून उत्तम गुण देते. आजारपणातून उठल्यावर तोंडाला चव नसेल तर म्हाळुंग सेवन करावे.
अत्यंत रुची उत्पन्न करणारे हे फळ आहे. उचकी, दमा, जुनाट कोरडा खोकला यात म्हाळुंग सेवन करणे लाभदायक आहे. म्हाळुंगचे फळ नियमित खाल्ले की, बराच लाभ होतो.
विंचू चावला असता म्हाळुंगच्या बिया वाटून लेप लावल्यास फायदा दिसतो. उलटी, मळमळ, तोंडाला पाणी सुटणे अशा लक्षणात म्हाळुंगाचे सेवन खूप लाभप्रद दिसते.
फळ खाल्ल्यावर रुग्णाला तत्काळ आराम मिळतो. पोटात दुखत असेल तर, पोटात गोळा आल्यासारखे वाटत असेल तर फळाचे सेवन लाभदायक आहे.
ज्या स्त्रियांना पाळी वेळेवर येत नाही आणि पाळीच्या वेळी फार कष्ट होतात, त्यांच्यासाठी फळ आणि बिया यांचा वापर वैद्यकीय सल्ल्याने करावा. अजिर्णामुळे पोटात दुखून त्रास होत असेल, तर महाळुंगाचे सेवन अमृततुल्य आहे.
म्हाळुंग हे हृदयाला बळ देणारा आहे. आजारामुळे हृदय कमकुवत झाले असेल, तर फळाचे सेवन खूप लाभदायक आहे. म्हाळुंगाच्या सेवनाने बुद्धी तल्लख होते.
मुतखड्यांत अत्यंत प्रभावीगळलिंबू आम्ल रसाचे असल्याने क्षारांपासून बनलेल्या मुतखड्यांत अत्यंत प्रभावी ठरते. अनसेपोटी गळलिंबू चाखून खावा. नंतर १ पेला कोमट पाणी प्यावे. अर्धा तास काहीही न खाता चालावे.
अधिक वाचा: Tukadebandi : तुकडेबंदीतील दस्त नियमित करण्या संदर्भात महसूलमंत्र्यांनी दिली 'ही' महत्वाची बातमी