Join us

तुमच्या मुलीचे लग्न व शिक्षणासाठी कुठे कराल पैशांची गुंतवणूक? 'हे' आहेत ३ पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 13:04 IST

तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी १०,००० रुपयांची मासिक गुंतवणूक १५ वर्षांमध्ये नेमका किती परतावा देईल, असा विचार करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे.

तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी १०,००० रुपयांची मासिक गुंतवणूक १५ वर्षांमध्ये नेमका किती परतावा देईल, असा विचार करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे.

येथे पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि एसआयपी या गुंतवणुकीच्या तीन पर्यायांची गणितासह तुलना केली आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार योग्य निर्णय घेऊ शकता.

कमी जोखमीसाठी पीपीएफसह सुकन्या समृद्धी योजना हे चांगले पर्याय आहेत, पण जर तुम्ही थोडीशी जोखीम घेऊ शकत असाल, तर दीर्घकाळ एसआयपीमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवता येतो. लक्षात घ्या, इथे १५ वर्षासाठी गणिती तुलना केली आहे.

पीपीएफ७.१% वार्षिक व्याजाने, तुमची एकूण गुंतवणूक १८ लाख रुपये असेल आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला सुमारे ३१.५५ लाख रुपये मिळतील, यात १३.५५ लाख रुपये व्याज असेल.

एसएसवायसुकन्या समृद्धी योजनेत ८.२% वार्षिक व्याजदराने, तुमची एकूण गुंतवणूक १८ लाख रुपये होऊन तुम्हाला सुमारे सुमारे ४७ लाख रुपये मिळतील, यात २९ लाख रुपये व्याज असेल.

एसआयपी१२% वार्षिक परताव्याच्या अंदाजाने, १८ लाख रुपयांची गुंतवणूक १५ वर्षात सुमारे ५०.४५ लाख रुपये होऊ शकते, यात ३२.४५ लाख रुपये नफा असेल. मात्र, यात जोखीम आहे.

अधिक वाचा: मोबाइलने ई-केवायसी करा आणि 'ह्या' कार्डवर पाच लाखांचे आरोग्य कवच मिळवा

टॅग्स :पैसापीपीएफबँकगुंतवणूकलग्नशिक्षणसरकारी योजना