Lokmat Agro >शेतशिवार > पेरणीपासून ते शेतमाल विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना कुठे कुठे द्यावा लागतोय जीएसटी? वाचा सविस्तर

पेरणीपासून ते शेतमाल विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना कुठे कुठे द्यावा लागतोय जीएसटी? वाचा सविस्तर

Where do farmers have to pay GST from sowing to selling farm produce? Read in detail | पेरणीपासून ते शेतमाल विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना कुठे कुठे द्यावा लागतोय जीएसटी? वाचा सविस्तर

पेरणीपासून ते शेतमाल विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना कुठे कुठे द्यावा लागतोय जीएसटी? वाचा सविस्तर

खते, कीटकनाशके, औजारांसह इतर गोष्टींवर ५ ते २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी आकारली जात असल्याने उत्पादन खर्चात हेक्टरी १५ हजार रुपये वाढ झाल्याचे दिसते.

खते, कीटकनाशके, औजारांसह इतर गोष्टींवर ५ ते २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी आकारली जात असल्याने उत्पादन खर्चात हेक्टरी १५ हजार रुपये वाढ झाल्याचे दिसते.

शेअर :

Join us
Join usNext

राजाराम लोंढे
कोल्हापूर : GST for Farmer बी पेरल्यापासून शेतमाल विक्रीपर्यंत लागणाऱ्या विविध करांनी शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे.

खते, कीटकनाशके, औजारांसह इतर गोष्टींवर ५ ते २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी आकारली जात असल्याने उत्पादन खर्चात हेक्टरी १५ हजार रुपये वाढ झाल्याचे दिसते. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही जीएसटीमुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याची कबुली दिली.

अशी होते आकारणी
ट्रॅक्टर स्पेअरपार्ट : २२ ते २८%
कीटकनाशके : १८%
तणनाशके : १८%
शेजी औजारे : १२ ते १८%
शेती पंप : १८%
फवारणी पंप : १२ ते १८%
पीव्हीसी पाइप : १२ ते १८%
ठिबक साहित्य : १२%
सेंद्रिय खते : १२%
रासायनिक खते : ५%
डिझेल : ५%

जीएसटीमुळे असा वाढला उत्पादन खर्च, हेक्टरी
रासायनिक खतांचा खर्च ५० हजार (५ टक्के जीएसटी) - २,५०० रुपये 
कीटक व तणनाशक ३० हजार (१८ टक्के जीएसटी) - ५,४०० रुपये
द्रव्य खते व टॉनिक १० हजार (१८ टक्के जीएसटी) - १,८०० रुपये
पीव्हीसी पाइप, ट्रॅक्टर स्पेअरपार्ट, डिझेल आदी २२ हजार (१२ ते २८ टक्के जीएसटी) - ४,५०० रुपये

मग शेतकऱ्यांना परतावा का नाही?
व्यापाऱ्यांकडून वसूल केलेल्या जीएसटीचा परतावा शासनाकडून मिळतो. पण, शेतकऱ्यांकडून वसूल केलेला जीएसटी गंगाजळीला जमा होतो. एकतर शेतकऱ्यांना जीएसटीच्या कक्षेतून बाहेर काढावे, अन्यथा त्यांना परतावा द्यावा, अशी मागणी होत आहे.

उत्पादन खर्च कमी होऊन आधारभाव मिळाल्याशिवाय शेती किफायतशीर होणे अशक्य आहे. शेती जीएसटीमुक्त करण्यासाठी आगामी काळात लढा उभा करावा लागणार आहे. केंद्र सरकार एका बाजूला आपण शेतकऱ्यांचे कसे कैवारी आहोत, असा आव आणते आणि प्रत्यक्षातील व्यवहार मात्र त्यांना लुबाडणाराच आहे. - डॉ. अजित नवले, राष्ट्रीय सहसचिव, किसान सभा

Web Title: Where do farmers have to pay GST from sowing to selling farm produce? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.