पूर्वी महसूल विभागाकडे असलेली पीएम किसान ही योजना आता कृषी विभागाकडे आली आहे. त्यामुळे शेतकरी लाभार्थी केवायसीची गती मंदावली आहे. त्यातच याच लाभार्थ्यांना नमो शेतकरी सन्मानचा हप्ता मिळणार असला तरीही अजून पहिला हप्ताच न मिळाल्याने ही योजना घोषणेतच दिसत आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे ३९६८ सरकार गेल्यानंतर आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारने नमो शेतकरी ५७५५ सन्मान निधी योजना घोषित केली. या योजनेतही शेतकऱ्यांना वर्षात तीन ३९८९ हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये देण्यात ३८२९६ येणार आहेत, मात्र अजून पहिला हप्ताच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा ४२२७० झाला नाही. ही योजना घोषित झाल्यानंतर पीएम किसान योजनेतील लाभार्थीच यासाठी पात्र गृहित धरले जाणार होते.
नमोचाही हप्ता रखडलेलाच
- पीएम किसानची लाभार्थी संख्या अजून निश्चित होत नसल्याने राज्य शासनाच्या नमो शेतकरी सन्मानचाही हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही.
- यात पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दूसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर व तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या काळात दिला जाणार आहे. मात्र आता दोन हप्ते मिळायला पाहिजे होते, ते मिळाले नाहीत.
हिंगोली जिल्ह्यात अशी आहे स्थिती
- जिल्ह्यातील ४१८२ जणांचे बँक खाते आधार संलग्न नाही.
- २१४२ जणांचे आधारप्रमाणे पोर्टलवर नाव नाही.
- तर ४९८ जणांच्या दोन आयडी व एक आधारचे लिंकिंग आहे.
- १२३९ जणांची भूमिअभिलेखप्रमाणे डाटा अद्ययावत करणे बाकी आहे.
- तर २२९९ जणांनी या योजनेसाठी नव्याने नोंदणी केली आहे.