Lokmat Agro >शेतशिवार > खरीपासाठी मराठवाडा कृषि विद्यापीठाची बियाणे विक्री कधी? कोणत्या बियाण्याला किती दर? वाचा सविस्तर

खरीपासाठी मराठवाडा कृषि विद्यापीठाची बियाणे विक्री कधी? कोणत्या बियाण्याला किती दर? वाचा सविस्तर

When will Marathwada Agricultural University sell seeds for Kharif? What is the price of which seeds? Read in detail | खरीपासाठी मराठवाडा कृषि विद्यापीठाची बियाणे विक्री कधी? कोणत्या बियाण्याला किती दर? वाचा सविस्तर

खरीपासाठी मराठवाडा कृषि विद्यापीठाची बियाणे विक्री कधी? कोणत्या बियाण्याला किती दर? वाचा सविस्तर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्‍तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने खरीप खरीप पीक परिसंवाद आयोजित केला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्‍तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने खरीप खरीप पीक परिसंवाद आयोजित केला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्‍तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने खरीपखरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शन या भव्य कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दिनांक १८ मे रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, उर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि राहणार आहेत. कार्यक्रमास राज्यसभा सदस्य श्रीमती फौजिया खान लोकसभा सदस्य, संजय जाधव विधान परिषद सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य, सतीश चव्हाण विधान परिषद सदस्य, विक्रम काळे विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य, राहुल पाटील विधानसभा सदस्य, रत्नाकर गुट्टे विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य, रमेशराव कराड विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य, अभिमन्यू पवार आणि विधानसभा सदस्य राजेश विटेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे (भाप्रसे), परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे (भाप्रसे), महाराष्ट्र शासनाचे माजी कृषि आयुक्त उमाकांत दांगट हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत.

विद्यापीठ कार्यकारी परिषद सन्मानीय सदस्य विठ्ठल सकपाळ, सुरज जगताप, प्रविण देशमुख, दिलीप देशमुख, आदिती सारडा, भागवत देवसरकर, डॉ. कौशिक बॅनर्जी, डॉ. व्ही. एम. मायंदे, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव संतोष वेणीकर, नियंत्रक प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता दीपक कशाळकर आदींची कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे.

परिसंवादात विद्यापीठाचे शास्त्रज्ञ विविध खरीप पिकांच्या लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी, बाजरी, कडधान्ये, भरडधान्यांचे महत्त्व, तसेच कीड व रोग व्यवस्थापन आदी विषयांचा समावेश आहे.

यावेळी शेतकरी बांधवांच्या कृषी विषयक शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या विविध घडीपत्रिका, पुस्तिका व शेतीभाती मासिकाचे प्रकाशन करण्यात येईल. त्याचबरोबर विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित कृषी साहित्याचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात शास्त्रज्ञांसह प्रगतशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन होणार असून, एकाच ठिकाणी तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या चमूमार्फत समस्यावर आधारित चर्चा घडवून आणण्यात येईल.

यामध्ये पिकानिहाय उद्योजकता विकास, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतीत वैविध्य जपण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन दिले जाईल, असे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी  सांगितले. कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ निर्मित बियाणे विक्रीने होणार आहे.

विक्रीसाठी उपलब्ध बियाणे व त्याचे दर पुढीलप्रमाणे
१) ज्वारी (परभणी शक्ती)
दर रु. १२५/- प्रती किलो (प्रती बॅग ४ किलो) एकूण दर रु. ५००/- प्रती बॅग.
एकूण ५०० बॅगा उपलब्ध.

२) मुग (वाण बीएम-२००३-२)
दर रु. २२०/-  प्रती किलो (प्रती बॅग ६ किलो) एकूण दर रु. १३२०/- प्रती बॅग.
एकूण ३३० बॅगा उपलब्ध.

३) तूर
बीडीएन-७१६ (लाल) ३०० बॅगा उपलब्ध.
बीडीएन-७११ (पांढरी) ३०० बॅगा उपलब्ध.
बीएसएमआर ८५३ (पांढरी) ८० बॅगा उपलब्ध.
बीएसएमआर ७३६ (लाल) १०० बॅगा उपलब्ध.
बीडीएन-१३-४१ गोदावरी (पांढरी) ८०० बॅगा उपलब्ध.
सर्वांचा दर रु. २५०/- प्रती किलो (प्रती बॅग ६ किलो) एकूण दर रु. १५००/- प्रती बॅग.
बीडीएन-१३-४१ गोदावरी (पांढरी) १६०० बॅग उपलब्ध (प्रती बॅग २ किलो)

४) सोयाबीन वाण
एमएयूएस-१६२ (७५१ बॅगा उपलब्ध)
एमएयूएस-१५८ (३०० बॅगा उपलब्ध)
आणि एमएयूएस- ७१ (३७६ बॅगा उपलब्ध)
सर्वांचा दर रु. १००/- प्रती किलो (प्रती बॅग २६ किलो) एकूण दर रु. २६००/- प्रती बॅग.

५) भरड धान्य
(राळा) पीडीकेव्ही यशश्री
दर रु. १००/- प्रती किलो (१ किलोची बॅग) एकूण दर रु. १००/- प्रती बॅग.
२०० बॅगा उपलब्ध.
(नाचणी) फुले कसारी
दर रु. १००/- प्रती किलो (१ किलोची बॅग) एकूण दर रु. १००/- प्रती बॅग.
२०० बॅगा उपलब्ध.

बियाणे खरेदीसाठी रोख रक्कम स्विकारण्यात येईल तसेच एका व्यक्तीस एका वाणाची एक बियाणे बॅग याप्रमाणे विक्री करण्यात येईल.

सदर परिसंवादाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठ युट्युब चॅनेलवर करण्‍यात येणार आहे. तरी परिसंवादात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे आणि जिल्‍हा अधीक्षक कृषि अधिकारी दौलत चव्हाण यांनी केले आहे.

अधिक वाचा: Jaltara : मनरेगातुन जलतारा खड्डा कसा आणि कुठे काढावा? किती मिळतंय अनुदान? वाचा सविस्तर

Web Title: When will Marathwada Agricultural University sell seeds for Kharif? What is the price of which seeds? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.